अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र ‘सीईटी’ परीक्षा हवी का; विद्यार्थ्यांनो नोंदवा मत

कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करण्यात येणार आहे.
Exam
ExamSakal

पुणे - राज्य सरकारने (State Government) दहावीच्या परीक्षा (SSC Exam) रद्द (Cancel) केल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी (Eleventh Admission) एक स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) (CET) असावा का, असा थेट प्रश्न शालेय शिक्षण विभागाने (Education Department) राज्यातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना (Student) विचारला आहे. या प्रश्नाद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचे मत विचारले जात आहे. विद्यार्थ्यांना मत नोंदविण्यासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र लिंकही खुली केली आहे. त्यामुळे तुम्ही दहावीत असाला आणि तुम्हाला अकरावीच्या प्रवेश परीक्षेबाबत काही सांगायचे असेल, तर तुम्हाला मत मांडता येणार आहे. (Separate CET exam required for admission to Class XI Students register vote)

कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करण्यात येणार आहे. परंतु इयत्ता अकरावीच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी एक स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करत आहे. अर्थात ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता दहावीचे विद्यार्थी देऊ शकतील, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

Exam
Pune Corona Update: १८ एप्रिलपासून ऍक्टिव्ह रुग्णसंख्या घटली २० हजाराने

अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेचे स्वरूप हे साधारणत: ओएमआर पद्धतीनुसार असावे. सर्व विषयांची मिळून एकत्रित एक पेपर असावा. पेपरसाठी सुमारे दोन तासांचा वेळ देण्यात येईल. ही परीक्षा साधारणत: जुलै महिन्यामध्ये किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात यावी, असे नियोजन करण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे.

कोरोनाविषयक सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर इच्छुक विद्यार्थ्यांना गुणात्मक तत्त्वावर अकरावीमध्ये प्रवेश देता येईल. राज्यातील सर्व अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे शंभर गुणांची ऑफलाइन प्रवेश चाचणी घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

- विद्यार्थ्यांना मत नोंदविण्यासाठी लिंक : https://www.research.net/r/11thCETTEST

- मत नोंदविण्यासाठी मुदत: ९ मे २०२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com