'मुळशी पॅटर्न" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये "मुळशी पेटर्न" चित्रपट पाहत असताना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. उमेश भाउसाहेब अरबाले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोल्हापुरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त घाडगे यांनी शुक्रवारी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधुन अरबाले हा मंगला चित्रपटगृहात चित्रपट पाहत असल्याची माहिती दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब वाघमले यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री 12 वाजता चित्रपटगृहातील 3 क्रमांकाच्या स्क्रीनभोवती वेढा दिला. त्यानंतर "मुळशी पेटर्न" चित्रपटाचा खेळ थांबवुन अरबाले यास अटक केली. त्यानंतर त्यास कोल्हापुर पोलिसांकडे सुपुर्द केले. अरबाले यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे विविध गुन्हे दाखल आहेत, असल्याची माहिती वाघमले यांनी दिली.

Web Title: serious Criminal was arrested by Pune police while watching "Mulshi Pattern"