Video : पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमधील आग आटोक्यात; 5 जणांचा मृत्यू

टीम ई सकाळ
Thursday, 21 January 2021

सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस निर्मिती केंद्र तसेच अन्य विविध प्रकारच्या लशींचे उत्पादन केले जाते. दरम्यान, गुरूवारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मांजरी येथील प्लांटमध्ये आग लागल्याची घटना घडली. सीरम इन्स्टिट्युटमधील "आर-बीसीजी' लस निर्मिती करणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या "कोवीशील्ड' लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे.

पुणे ः कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या दहा गाड्या व ब्रांटो ही अद्ययावत यंत्रणा असलेली गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान आगीत अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढले असून 5 जणांचा मृत्यू  झाल्याची माहिती समोर येत आहे.

​सीरम इन्स्टिट्युटमधील "आर-बीसीजी' लस निर्मिती करणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या"कोवीशील्ड' लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला निघाले आहेत. आगीच्या पार्श्वभुमीवर अजित पवार देणार सीरमला भेट देणार आहेत. तसेच "सीरममधील आग नियंत्रणात आली आहे. बीसीजी प्लांटमध्ये आगीचा प्रकार घडला आहे. सुदैवाने कोविशील्ड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. विद्युत बिघाडामुळे आग लागली होती. पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील भाष्य करणे योग्य ठरेल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

serum institute fire broke on second floor

कोरोनावरील "कोविशील्ड' या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे. काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. 

 

सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण​

serum institute fire broke on second floor

सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस निर्मिती केंद्र तसेच अन्य विविध प्रकारच्या लशींचे उत्पादन केले जाते. दरम्यान, गुरूवारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मांजरी येथील प्लांटमध्ये आग लागल्याची घटना घडली.

Image may contain: cloud, sky and outdoor, text that says "सकाळ TERMINAL1"
सीरम इन्स्टिट्युटमधील "आर-बीसीजी' लस निर्मिती करणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या "कोवीशील्ड' लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे.

serum institute fire broke on second floor

दरम्यान, घटनेची खबर मध्यवर्ती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर सुरूवातीला चार गाड्या आणि त्यानंतर आणखी सहा गाड्या घटनास्थळी तातडीने पाठविण्यात आल्या. याबरोबरच आग विझविण्याची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ब्रांटो या गाडीलाही तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले.

serum institute fire broke on second floor

अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रासह हडपसर, कोंढवा व अन्य केंद्राच्या गाड्या व जवान आग विझविण्याच्या प्रयत्नात आहेत. याबरोबरच आगीच्या ठिकाणी पोलिसही तत्काळ दाखल झाले असून तेथे जमा झालेल्या गर्दीला हटविण्याचे तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे काम हडपसर पोलिसांकडून केले जात आहे.
 
सीरममध्ये भीषण आग; कोविशिल्ड लसीचा प्लांट सुरक्षित आहे का?

serum institute fire broke on second floor

 

 5 जण सुखरुप बाहेर 

इलेक्ट्रिक व फर्निचरचे काम करणारे 5 कामगारांना सुखरुप बाहेर काढले, आणखी काही जण अडकले असण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. आग लागलेल्या "आर-बीसीजी' लस निर्मितीच्या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक व फर्निचरचे काम करणारे कामगारांचा समावेश आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी काही वेळातच पाच संशोधकांना आग लागलेल्या इमारतीमधून सुखरुप बाहेर काढले. मात्र आतमध्ये आणखी काही जण असण्याची शक्‍यता अग्निशामक दलाने व्यक्त केली आहे. आतमध्ये किती जण काम करत होते, याबाबतची माहिती अग्निशामक दलाला मिळालेली नाही. तरीही आतमध्ये काही व्यक्ती असण्याची शक्‍यता गृहीत धरून एकीकडे आग आटोक्यात आणताना दुसरीकडे आतमधील लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. 

Image may contain: people sitting, cloud, sky, night and outdoor, text that says "सकाळ TERMINAL"

'ब्रांटो'ची अत्यावश्‍यक मदत 
अग्निशामक दलाच्या अन्य बंब, पाण्याचे टॅंक यांच्या माध्यमातून जवानांकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचबरोबर अग्निशामक दलाकडे आग विझविण्यासाठी असलेल्या "ब्रांटो' या अत्याधुनिक यंत्रणायुक्त गाडीलाही घटनास्थळी आणण्यात आले आहे. "ब्रांटो ही तब्बल 70 मीटर उंच असून ती 21 व्या मजल्यापर्यंतची आग विझविण्यासाठी उपयुक्त ठरते. सध्या "ब्रांटो'चा उपयोग आग विझविण्यासाठी करण्याबरोबरच आतमध्ये अडकलेल्या नागरीकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठीही केला जात आहे.

सीरमच्या "त्या' इमारतीमध्ये कुठलेही उत्पादन नाही, इलेक्‍ट्रीक व फर्निचरचे काम होते सुरू - पोलिस आयुक्त 

सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी प्लांटमध्ये एक इमारत आहे. संबंधीत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक लॅब आहे, तेथे कोविशील्ड लसीची निर्मिती होत नाही, त्याचबरोबर अन्य कोणत्याही प्रकारचे उत्पादन होत नाही. सध्या तेथे इलेक्‍ट्रीकल व फर्निचरचे काम सुरू होते. त्यामुळे इलेक्‍ट्रीकचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे कर्मचारी तेथे उपस्थित होते. त्या चार ते पाच जणांना अग्निशामक दलास बाहेर काढण्यात आले आहे. लवकरच आगीवर नियंत्रण मिळविले जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. गुप्ता यांनी आगीचे खबर मिळताच घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दल व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत आगीबाबतची माहिती घेतली. 

Fire In Serum Institute : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अग्नीतांडव; पाहा फोटो

"सीरम इन्स्टिट्युटचा मांजरी येथील एसएझेडचा भाग आहे. तेथे अजून प्रकल्पाचे काम सुरू आहे. कोविड लशीचा तेथे काहीही संबंध नाही. भविष्यात ते होऊ शकते. तेथे संबंधीत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका लॅबचे काम सुरू आहे. तेथेच ही आग लागली आहे. आगीच्या ठिकाणी सीरमचे कोणीही अधिकारी व कर्मचारी नव्हते. इलेक्‍ट्रीकचे काम करणारे कंत्राटदाराचे काहीजण काम करत होते. त्यापैकी चार ते पाच जणांना बाहेर काढले आहे. संबंधीत इमारतीमध्ये बीसीजीच्या रोटाव्हायरस या लसीचे काम सुरू असते. मात्र तेथे सध्या रोटाव्हायरस लशीचा कुठलाही साठा ठेवलेला नाही.''
- विवेक प्रधान, व्यवस्थापकीय संचालक , सीरम इन्स्टिट्युट. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
 

"सीरममधील आग नियंत्रणात आली आहे. बीसीजी प्लांटमध्ये आगीचा प्रकार घडला आहे. सुदैवाने कोविशील्ड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. विद्युत बिघाडामुळे आग लागली होती. पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील भाष्य करणे योग्य ठरेल"
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute fire broke on second floor

Tags
टॉपिकस