देशभरात लस पोचविण्यासाठी ‘सीरम’ झाली सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 January 2021

लशीचे डोस तयार आहेत. त्यामुळे सरकारचे आदेश मिळताच देशातील कोणत्याही कोपऱ्यात लस पोचविण्यासाठी सज्ज आहोत, असा विश्‍वास ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’तर्फे (एसआयआय) व्यक्त करण्यात आला.

पुणे - लशीचे डोस तयार आहेत. त्यामुळे सरकारचे आदेश मिळताच देशातील कोणत्याही कोपऱ्यात लस पोचविण्यासाठी सज्ज आहोत, असा विश्‍वास ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’तर्फे (एसआयआय) व्यक्त करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित करून पुण्यातील ‘एसआयआय’मध्ये उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लशीला केंद्र सरकारने रविवारी अखेर आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे आता राज्यात प्रत्यक्षात कधी लशीकरण सुरू होणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘एसआयआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादातून ही माहिती पुढे आली. राज्यातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉक्‍टर, परिचारिकांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला पहिल्या टप्प्यात ही लस देण्यात येणार आहे.

No photo description available.

सरकारी, महापालिकेच्या आरोग्य विभागाबरोबरच खासगी रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्‍टरांनाही ही लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांची नावनोंदणी ‘कोविन ॲप’वर करण्यात आली. या प्रत्येकापर्यंत लशीचे डोस पोचविण्याची व्यवस्था राज्यातर्फे करण्यात येत आहे.

शिक्षकांची तपासणी नाही, पालकांचे हमीपत्र नाही; विद्यार्थी खोळंबले शाळेच्या दारातच

‘एसआयआय’मध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस उत्पादन केले आहे. सरकारने केलेल्या मागणीप्रमाणे हे डोस देशाच्या कोणत्याही भागात तातडीने पोचविता येईल. केंद्र सरकारकडून लशीची खरेदी होणार आहे. त्या प्रमाणे खरेदी आदेश कंपनीला मिळतील. त्या आधारावर डोसचे वितरण होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

अनोख्या पद्धतीने केलं पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्रात कधी मिळणार लस?
कोणत्या कंपनीच्या किती लस द्यायच्या, त्या कशा वितरित करायच्या, याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. केंद्राने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे राज्यात लशींचे वितरण होईल. लस देण्याची व्यवस्था राज्यात सक्रिय झाली आहे. त्यासाठी त्याची रंगीत तालीमही करण्यात आली. आता फक्त प्रत्यक्ष लस कधी येईल, याची उत्सुकता आहे.

ग्रामपंचायत लढती आज स्पष्ट होणार;उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

ही लस विकसित करणे, हे निश्‍चितच युद्धपातळीवर प्रयत्न करून झाली आहे. अर्थात, यात सांघिक कामगिरी खूप मोठी आहे. तपासणीपासून ते उत्पादकापर्यंत प्रत्येकाचे योगदान आहे. क्‍लिनिकल आणि इंजिनिअरिंग हे यातील प्रमुख घटक आहेत. संपूर्ण सीरम इन्स्टिट्यूटचे हे ध्येय होते. त्यामुळे संपूर्ण टीम एकाच ध्येयासाठी झटत होती. त्यामुळे हे शक्‍य झाले. 
- डॉ. राजीव ढेरे, संचालक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum Institute ready deliver vaccine across the country