पालिकेचे ग्रंथालय अजुनही बंद, जगावं कसं ! सेवक, कर्मचाऱ्यांची व्यथा

Servants, employees are Stress due to Municipal library still closed
Servants, employees are Stress due to Municipal library still closed

रामवाडी (पुणे) :  कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विरुंगुळा केंद्रे, उद्यानातील ओपन जीम महापालिकेचे ग्रंथालय बंद ठेवण्यात आली आहे. ग्रंथालय अद्याप सुरु नसल्याने ज्या ग्रंथालयात तुटपुंज्या वेतनावर काम करणारे सेवक, कर्मचारी ग्रंथालय कधी उघडणार या प्रतिक्षेत दिवस ढकलत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 मराठी साहित्य संस्कृती जपण्याचे योगदान म्हणुन ज्या वाचनसंस्कृतीकडे पहिले जाते असे महापालिकेचे ग्रंथालय वाचकांसाठी पालिकेच्या  हद्दीत अनेक ठिकाणी उभारण्यात आले. त्या ग्रंथालयात काम करणारे ग्रंथपाल सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. कोरोनाचा वाढता संसर्गाच्या  दृष्टीने प्रशासनाने  मार्च महिन्या पासुन ग्रंथालय बंद ठेवली यामुळे महिनाकाठी मिळणारे तुंटपुज्य वेतन ही बंद झाल्याने संसारात तेल-मीठ, अन्न-धान्य भाजीपाला आणण्यासाठी या पैशाचा आधार होता तो ही नाहीसा झाल्याने जगावं कसं हा प्रश्न महापालिकेच्या ग्रंथालयात काम करणाऱ्या सेवकांपुढे निर्माण झाला आहे. 

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

''अनलॉकपासुन अनेक व्यवहार सुरु आहे. मनाला शांती देणारे आपल्या ज्ञानात भर पडणारे पुस्तक अर्थात  वाचनालय मात्र सुरु झाले नाही. जर प्रशासनाने सर्व सुचना व नियम आखुन दिले तर वाचक त्या  नियमांचे पालन करीत ग्रंथालयातील पुस्तकांचा मनमुराद आनंद घेऊ शकतो.''
एकनाथ लंघे - वाचक 

पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com