सेवा रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पिंपरी - कासारवाडीतील सेवा रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. या परिसरात मेट्रोच्या कामाला सुरवात झाली असताना रस्तावरील अतिक्रमणे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिस आणि मेट्रो या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 
कासारवाडीहून खराळवाडीकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरमधील रस्ता अनेक दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बाजूला असणाऱ्या सेवा रस्त्यावरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

रस्त्यालगतच्‍या चौकामध्येच खासगी प्रवासी बसगाड्या प्रवासी घेण्यासाठी थांबतात. कासारवाडी रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षाचालकांचा अनधिकृत थांबा आहे, त्यामुळे बऱ्याचदा या चौकामध्ये ट्रॅफिक जॅम झालेले असते. काही दिवसांपासून कासारवाडीतून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मेट्रोचे काम सुरू झाले आहे, त्यामुळे ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

दरम्यान, सेवा रस्त्यावर वाहनांच्या दुरुस्तीची दुकाने आहेत. या गॅरेजबाहेर कायम वाहनांची गर्दी झालेली असते. त्यामुळे सेवा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तिथे अडकून पडावे लागते. अनेकदा  वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक पोलिस त्याकडे लक्ष देत नसल्याने या भागातील वाहतूक समस्या गंभीर होत चालली असल्याची भावना चालकांनी व्यक्‍त केली.

ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक बंद असते, त्यामुळे नागरिकांना सेवा रस्त्याचा वापर करावा लागतो. कासारवाडीतील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, त्यामुळे वाहन चालवताना अडचण येते. या रस्त्यावर विरुद्ध बाजूने देखील वाहने येत असतात, त्यामुळे तिथे अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे.  मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे, याचा विचार करून वाहतूक पोलिस आणि मेट्रो उभारणाऱ्या कंपनीने यामध्ये लक्ष देण्याची 
आवश्‍यकता आहे.
- एस. विश्‍वनाथ, नागरिक, निगडी

Web Title: Service road encroachment traffic