मिलिंद एकबोटेंवरील जामीनाच्या अटी शिथिल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी शिथिल कराव्या यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. शिरसिकर यांनी मान्य केला.

पुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी शिथिल कराव्या यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. शिरसिकर यांनी मान्य केला.

 कोरेगाव भिमा हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठाणचे प्रमुख संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, योगेश नरहरी गव्हाणे, गणेश भाऊसाहेब फडतरे आणि अनिल दवे या पाच जणांवर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 15 मार्चला न्यायालात हजर केल्यानंतर त्यांना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी होऊन पोलिस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ न्यायालयाने केली होती. याप्रकरणात एकबोटे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यानी जामीनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना विविध अटी शर्तीवर जामीन देण्यात आला होता. 

सुरू असलेला मोबाईल नंबर पोलिसांना देण्याचे व पोलिसांना तपासात सहकार्य करणे, पत्रकार परिषद न घेणे, सभा न घेणे, सभेत भाषण न करणे, दर सोमवारी शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावणे, न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय भारत सोडून न जाण्याच्या अशा विविध अटींवर जामीन मंजूर करण्यात आला होता. तसेच अटी शर्तींचा भंग झाल्यास जामीन रद्द करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले होते. 

घालण्यात आलेल्या अटीजाचक असल्याने एकबोटे यांनी अॅड. एस. के. जैन आणि अॅड अमोल डांगे यांच्या मार्फत या अटी शिथिल कराव्यात म्हणून सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने पत्रकार  परिषद घेणे, सर्वजनिक ठिकाणी भाषण करणे आणि पोलिस ठाण्यात हजेरी लावणे ह्या अटी आता शिथील केल्याने एकबोटे यांना दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Session court loose the terms for milind ekbote bell