सेट परीक्षा आता ३०० गुणांसाठी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) स्वरूप बदलण्यात आले आहे. यापूर्वी सेट परीक्षेसाठी तीन प्रश्‍नपत्रिका आणि त्याही ३५० गुणांसाठी असायचा. मात्र यंदापासून सेट परीक्षेत ३०० गुणांसाठी दोन प्रश्‍नपत्रिका असणार आहे. यंदा ही परीक्षा ३० जूनमध्ये होण्याची शक्‍यता असून, याला लवकरच विद्यापीठातर्फे अंतिम मान्यता देण्यात येईल.

यंदा नेटच्या धर्तीवर सेट परीक्षेच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे यंदा होणारी ही पहिली परीक्षा असणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज कधी करायचा, अर्जाची मुदत काय असेल, या संदर्भात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात येईल. गेल्या वर्षी जानेवारीत सेट परीक्षा झाली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षांहून अधिकाकाळ उलटून गेल्यानंतर यंदा ही परीक्षा होत आहे. सेट परीक्षेची संभाव्य तारीख ३० जून आहे. या तारखेला विद्यापीठाच्या वतीने अंतिम मान्यता देण्यात आल्यानंतर ही तारीख अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल, असे सेट परीक्षेचे समन्वयक डॉ. बाळासाहेब कापडणीस यांनी सांगितले.

सेट परीक्षेत यापूर्वी ३५० गुणांसाठी तीन प्रश्‍नपत्रिका असायच्या आता ३०० गुणांसाठी दोन प्रश्‍न पत्रिका असणार आहेत. पहिल्या प्रश्‍नपत्रिकेत (पेपर-एक) १०० गुणांसाठी ५० प्रश्‍न असतील, तर दुसऱ्या प्रश्‍नपत्रिकेत (पेपर- दोन) २०० गुणांसाठी १०० प्रश्‍न असणार आहेत. यंदाही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. मात्र पुढील वर्षी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत.

अर्ज होणार ‘आधार कार्ड’शी लिंक
यंदापासून सेट परीक्षेसाठी केलेला ऑनलाइन अर्ज उमेदवाराच्या ‘आधार कार्ड’शी लिंक केला जाणार आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यानुसार सेट परीक्षेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता उमेदवारांना अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे.

अशी होईल सेट परीक्षा
पेपर            प्रश्‍न संख्या    गुण

पेपर- एक         ५०           १००
पेपर- दोन       १००          २००
एकूण  गुण                      ३००

Web Title: Set Exam for 300 Marks