राज्यात सेट परीक्षेचा निकाल ६.७८ टक्के

Exam
Exam

पुणे - महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी झालेल्या सेट परीक्षेचा निकाल ६.७८ टक्के लागला आहे. हा निकाल शुक्रवारी (ता. ११) दुपारी दोननंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. या परीक्षेला ७९ हजार ८७९ उमेदवार बसले होते. त्यापैकी ५ हजार ४१५ जण उत्तीर्ण झाले आहेत.

सेट परीक्षेचा हा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर तो http://setexam.unipune.ac.in/ या लिंकवर पाहता येणार आहे. उत्तीर्ण उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत आवश्‍यक असलेली स्व-साक्षांकित पात्रता प्रमाणपत्रे ऑनलाइन अर्जासह सादर करणे अपेक्षित आहे, अशी माहिती या सेट परीक्षेचे समन्वयक प्रा. बी. पी. कापडणीस यांनी दिली.

उमेदवारांनी सादर करावयाच्या प्रमाणपत्रांमध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षीची किंवा समकक्ष परीक्षेची गुणपत्रिका, नाव बदलले असल्यास लग्नाचे प्रमाणपत्र/गॅझेटची प्रत, जात प्रमाणपत्र/वैधता प्रमाणपत्र, आवश्‍यक प्रवर्गांसाठी नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, दृष्टीशी संबंधित किंवा शारीरिकदृष्ट्या विशेष व्यक्तींसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, अनाथ किंवा ट्रान्सजेंडर गटात मोडणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्‍यक प्रमाणपत्र सादर करायचे आहे, असे कापडणीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com