तक्रारींसाठी विशेष केंद्र उभारणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे - पोलिस ठाण्यामध्ये येऊन समस्या सांगण्यात ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना अडचणी येतात. पोलिसांशी संवाद साधताना भीती वाटते. यामुळे त्यांना तक्रार करता येईल यासाठी एक विशेष केंद्र एका महिन्यात सोयीस्कर ठिकाणी उभारण्यात येणार आहे,’’ असे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी रविवारी येथे सांगितले.

आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र यांच्यातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात वेंकटेशम बोलत होते. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, आयएलसीआयचे अध्यक्ष जयंत उमराणीकर, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते. कार्यक्रमात आनंदी ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघ यांना ‘कै. बी. जी. देशमुख उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवृत्त कर्नल शशिकांत दळवी तसेच डॉ. मानसिंगराव जगताप, हिरजी पाटील, शरयू पोतदार यांना कै. बी. जी. देशमुख जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात केले. डॉ. माशेलकर आणि ग्रामीण भागातील सामाजिक कार्याबद्दल पांडुरंग गायकवाड यांचा आयएलसीआयतर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘‘जीवनशैली, पोषणमूल्ये, पर्यावरण हे आरोग्याचे खांब मजबूत असतील तर आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्‌भवणार नाहीत. आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या हातात असते.’’ 

Web Title: To set up special centers for complaints