फेमस होण्यासाठी केलेला गोळीबार आला अंगलट; सात जणांना अटक

 जनार्दन दांडगे
Thursday, 28 January 2021

-शिरुर शहरात टोळीचे नाव फेमस करण्यासाठी गोळीबार करणाऱ्या निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप उर्फ एनके ग्रुपच्या सात सदस्यांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडून अटक. -प्रजाकसत्ताकदिनी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यात केला होता गोळीबार. 

लोणी काळभोर - शिरुर शहर व परीसरात ग्रुपचे नाव फेमस करण्यासाठी मंगळवारी (ता. 26) प्रजाकसत्ताक दिनी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरुर शहरातील भर रस्त्यात गोळीबार करणाऱ्या निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप उर्फ एन के ग्रुपच्या सात सदस्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हडपसर परीसरातुन बुधवारी पहाटे अटक केली आहे. ग्रुपमधील सात सदस्यांना अटक करण्यात आलेले असले तरी, या ग्रुपचा प्रमुख निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप व त्याचे दोन भाऊ पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेले सातही आरोपी हडपसर परीसरातील अट्टल गुन्हेगार असून, या ग्रुपचा प्रमुख निलेश उर्फ नानु कुर्लप याच्यावर शिरुरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा कांही वर्षापूर्वी खून केलाचा आरोपही आहे. 

हे वाचा - शेतकरी शब्द पाळणार नाहीत याचा अंदाज आलेला; नेत्यांनी विश्वासघात केल्याचा पोलिसांचा आरोप

स्थानिक गुन्हे अन्वेशऩ शाखेने दिलेल्या माहितीनुसार, टायगर ग्रुपचे सदस्य प्रविण गोकुळ गव्हाणे (शिरुर) हे मंगळवारी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निर्माण प्लाझा ते बाबुरावनगर रोडने मोटारसायकलवरुन जात असतांना, त्यांच्यावर गोळीबार झाला होता. तसेच कांही जनांनी गव्हाणे यांच्यावर कोयत्यानेही वार केले होते. या प्रकरणी शिरुर पोलिसात निलेश कुर्लप याच्यासह, मुकेश कुर्लप, गणेश कुर्लप, महेंद्र येवले, गोपाळ यादव व राहुल पवार (रा. रांजणगाव ता. शिरुर) यांच्यासह अनोळखी सात जनांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. वरील प्रकरण गंभीर असल्याने, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी वरील गुन्हाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला करण्याच्या सुचना दिल्या होत्या. या सुचनेनुसार, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शऩाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, राजु पुणेकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अजित भुजबळ, विजय कांचन, गुरू जाधव, मंगेश थिगळे, धिरज जाधव, अक्षय नवले, बाळासाहेब खडके, दगडु विरकर, समाधान नाईकनवरे यांनी वरील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

देवीच्या मंदिरात महिला पुजारीची मागणी; तृप्ती देसाईंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपाळ संजय यादव (रा. पुणे) याच्यासह शुभम सतिश पवार (रा. पापडेवस्ती, भेकराईनगर), अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले (रा. भेकराईनगर फुरसुंगी), शुभम विजय पांचाळ (रा. हडपसर, पुणे), निशांत भगवान भगत (रा. भेकराईनगर फुरसुंगी), आदित्य औदुंबर डंबरे (रा. ससाणेनगर, हडपसर) व शुभम उर्फ बंटी किसन यादव, (रा.गोंधळेनगर, हडपसर) या सात जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी व एन के ग्रुपचा संस्थापक निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप याच्यासह त्याचे दोन भाऊ, मुकेश उर्फ बाबु चंद्रकांत कुर्लप, गणेश चंद्रकांत कुर्लप (रा. कामाठीपुरा, शिरुर) हे तीनही जण वाघोली परीसरातुन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. 

दरम्यान गुन्हातील गोपाळ संजय यादव हा आरोपी सासवड परीसरात लपला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. शिवाजी ननवरे व त्याच्या सहकाऱ्यांनी सासवड परीसरातून यादव याला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, शिरुर शहरात टोळीचे नाव फेमस करण्यासाठी निलेश कुर्लप याने प्रविण गव्हाणे यांचा खुन करण्यासाठी हडपसर परीसरातील एका टोळीला सुपारी दिल्याची माहिती यादव याने पोलिसांना दिली. तसेच प्रविण गव्हाणे यांना जिवे मारण्यासाठी गोळीबार करणाऱ्या आरोपींचीही नावे पोलिसांना दिली. यादव याने दि्लेल्या माहितीच्या आधारे शिवाजी ननवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुभम पवार, अभिजीत भोसले, शुभम पांचाळ, निशांत भगत, आदित्य डुंबरे व शुभम उर्फ बंटी यादव या आरोपींना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहकारी ताब्यात, सूत्रधार मात्र फऱार
दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेशऩ शाखेने सात आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये या प्रकरणाचा सूत्रधार निलेश कुर्लप याच्यासह, मुकेश कुर्लप, गणेश कुर्लप हे तिघे वाघोली परीसरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निलेश लपुन बसलेल्या जागेवर पोलिसांना छापाही टाकला होता. मात्र पोलिस पोहोचण्यापुर्वीच निलेश व त्याचे दोन भाऊ वाघोली परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रमुख आरोपी हे हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या हडपसर परीसरात अऩेक गंभईर गुन्हे दाखल आहेत. अभिजीत भोसलेव गोपाळ यादव या दोघांच्यावर हडपसर पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.  शुभम पवार विरोधात अवैधरित्या हत्यार बाळगल्याचा, अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले याचेविरूद्ध खुन, खुनाचा प्रयत्न,दुखापत करणे, शुभम विजय पांचाळ याचेविरूध्द खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, निशांत भगत याचे विरूध्द दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, आदित्य औदुंबर डंबरे याचेविरूद्ध खुनाचा प्रयत्न करणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven members of the NK group arrested for shooting to become famous