esakal | पुण्यात मेट्रोचे सात नवे मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Metro-Route

दोन महिन्यांत प्रकल्प अहवाल 
हडपसर - शेवाळवाडी, माण- हिंजवडी, माण- पिरंगुट या मेट्रोच्या विस्तारीकरणाच्या मार्गांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यास पीएमआरडीएने या पूर्वीच सुरुवात केली आहे. येत्या दोन महिन्यांत ते तयार होतील. पीएमआरडीने तयार केलेल्या वाहतूक आराखड्यातही या मार्गांचा समावेश आहे. यामुळे माणपासून आता शेवाळवाडीपर्यंत नागरिकांना मेट्रो उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्वारगेट-खडकवासला मेट्रो नाहीच ! 
स्वारगेट- खडकवासला दरम्यान मेट्रो प्रकल्प मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लावून धरली आहे. त्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव आणि संबंधित मेट्रो अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यानुसार, महापालिका आणि महामेट्रो यांच्यात प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी २४ जून रोजी चर्चा झाली होती. परंतु, त्यात पुढे काही प्रगती झालेली नाही. या अर्थसंकल्पात मेट्रोचे सात नवे मार्ग मंजूर करताना, या मार्गाचा मात्र, राज्य सरकारला विसर पडला. सिंहगड रस्त्यावर मेट्रो झाली असती तर, किमान ३ लाख लोकसंख्येला फायदा झाला असता.

पुण्यात मेट्रोचे सात नवे मार्ग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राज्य सरकारकडून तरतूद; १६५६ कोटी जाहीर
पुणे - शहरातील तीन प्रमुख मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकारने १६५६ कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात मेट्रोचे सात नवे मार्ग अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे जाळे निर्माण होण्यासाठी एक नवे पाऊल पुढे पडले आहे. दरम्यान पुणे मेट्रोसाठी ६४० कोटी रुपये, नागपूर मेट्रोसाठी सुमारे ३०० कोटी आणि पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी ७१६ कोटी रुपयांच्या तरतुदीचा त्यात समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महामेट्रोकडून होत असलेल्या पिंपरी - स्वारगेट मेट्रो मार्गावर स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी - निगडी दरम्यान विस्तारीकरण होणार आहे. वनाज- रामवाडी मेट्रो मार्गावर वनाज- चांदणी चौक दरम्यान आणि रामवाडी - वाघोली दरम्यान मेट्रो मार्ग होणार आहे. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) होत असलेल्या हिंजवडी - फुरसुंगी मेट्रो मार्गावर फुरसुंगी ते शेवाळवाडी आणि माण ते हिंजवडी मार्गावर विस्तारीकरण होणार आहे. दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रकल्पासाठी भरीव तरतूद केल्यामुळे आता कामाला वेग येईल, अशी प्रतिक्रिया महामेट्रोचे मनुष्यबळ विकास विभागाचे महासंचालक हेमंत सोनावणे यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही पेशंट नाही, पण...

कात्रजला ४ हजार कोटींची गरज
स्वारगेट - कात्रज मार्गाच्या विस्तारीकरणासाठी प्रकल्प अहवाल महामेट्रोने या पूर्वीच महापालिकेला सादर केला आहे. त्यात या मार्गावर भुयारी मेट्रो केल्यास सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील राज्य सरकार किती निधी देणार, महापालिका किती निधी उभारणार आणि केंद्र सरकार काही मदत करणार का, याचा अद्याप तिढा सुटलेला नाही. मात्र, राज्य सरकारने आता या मार्गासाठी निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे केंद्राच्या निधीकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे. 

पुणे : निर्बंध घातल्यावर काढले सव्वा दोन कोटी

पिंपरीचे केंद्राकडे लक्ष
पिंपरी - निगडी या विस्तारीत मार्गासाठी महामेट्रोने या पूर्वीच प्रकल्प अहवाल तयार करून पिंपरी चिंचवड महापालिकेत सादर केला आहे. त्यानुसार या मार्गासाठी सुमारे १०४८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यासाठीही राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. आता केंद्र सरकार किती निधी देणार, याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचे लक्ष लागले आहे. अन्‌ त्यावर विस्तारीत मार्गाचा प्रकल्प अवलंबून असेल.  

निधी आला ; प्रकल्प अहवाल बाकी 
रामवाडी - वाघोली, चांदणी चौक - वनाज यांचे प्रकल्प अहवाल अद्याप तयार झालेले नाहीत. महापालिकेने हे प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितल्यावर, त्या बाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे महामेट्रोतर्फे सांगण्यात आले.