'रिव्हर सायक्‍लोथॉन'मध्ये 7 हजार सायकलपटूंचा सहभाग 

Seven Thousand cyclists participated in River Cyclothon
Seven Thousand cyclists participated in River Cyclothon

पिंपरी : अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे, भोसरी येथे आयोजित दुसऱ्या 'रिव्हर सायक्‍लोथॉन'मध्ये सुमारे 7 हजार सायकलपटूंनी सायकली चालवित इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

 पुणे : वारज्यात गटाराच्या चेंबरमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

कै.अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ सकाळी 6.30 वाजता महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, माजी महापौर राहुल जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत सायकल फेरीला सुरुवात झाली. 5 किलोमीटर अंतरासाठी साडेतीन हजार सायकलपटूंनी भाग घेतला. त्यामध्ये, मुख्यत्वे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. जय गणेश साम्राज्य आणि परत लांडगे सभागृह असा त्यांचा मार्ग राहिला. तर 10 किमी अंतरासाठी 2 हजार आणि 20 किमीसाठी सुमारे दीड हजार सायकलपटूंनी भाग घेत सायकली चालविल्या. 20 किमीसाठी स्पाईन रस्ता, क्रांती चौक, साने चौक, कृष्णा नगर मार्गे परत अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग राहिला. यानिमित्त, आयर्नमॅन शर्यतीमधील 12 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. 

‘एचआयव्ही’वरील औषधांचा तुटवडा
 

या सायक्‍लोथॉनच्या निमित्ताने पर्यावरणावर आधारित चित्रकला स्पर्धाही भरविण्यात आली. त्यामध्ये 55 शाळांमधील 55 हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. चालू महिन्याअखेरपर्यंत स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल, असे संयोजकांनी कळविले आहे. मुख्य संयोजक सचिन लांडगे यांनी संयोजन केले. डॉ.नीलेश लोंढे, दिगंबर जोशी, बापू शिंदे, डॉ.आनंद पिसे, निखिल कालकुटे, शिवाजी लांडगे आदींचे सहकार्य लाभले. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com