दिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त सिंचन भवन येथे आयोजित दिव्यांगांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी कामगार नेते बाबा आढाव, अपंग कल्याण मंडळाचे आयुक्त रुचेश जयवंशी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कडू म्हणाले, ‘‘दिव्यांगांना वेगवेगळ्या क्षेत्रांत आरक्षण दिले पाहिजे. दुकानासाठी गाळे, घरकुल, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत शासनाने आरक्षण दिले, तर या व्यक्ती स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. ७० वर्षांपासून दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आता हा लढा द्यावा लागत आहे.’’ 

या वेळी आढाव यांनी अपंग कल्याण मंडळाला निधी किती मिळतोय, तो पुरेसा आहे का, मंडळात कामगारांची संख्या किती?, असे प्रश्‍न उपस्थित करीत मंडळामधील पदे ही दिव्यांगांसाठीच राखीव असावीत, अशी मागणी केली. ते म्हणाले, ‘‘दिव्यांग असणे हा गुन्हा नाही, त्यामुळे त्यांनी अभिमानाने जगण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात.’’

या वेळी उपस्थितांनी मंडळाच्या आयुक्तांसमोर समस्या मांडल्या. त्यावर पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विभागीय स्तरावर बैठक घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: seventh anniversary of the Pahar Handicapped Revolution movement