पिंपळे सौदागरमध्ये पदयात्रेतद्वारे सत्तर किलो प्लास्टिक जमा 

मिलिंद संधान
रविवार, 24 जून 2018

नवी सांगवी : प्लास्टिक बंदीच्या समर्थनार्थ जनजागृती करण्यासाठी पिंपळे सौदागर येथील नागरिकांनी आज पदयात्रेचे आयोजन केले होते. महापालिका मैदान ते शिवार चौकापर्यंत आयोजित केलेल्या या पदयात्रेत रोझलँण्ड, राजवीर, साई अँम्बेन्स, द्वारकाधिश, कुणाल आयकॉन, जिंजर, प्लँनेट मिलेनियम, शिवसाई या गृहनिर्माण वसाहतींमधील नागरिक यात सहभागी झाले होते.  

यावेळी स्थानिक नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शितल काटे व कार्यकर्ते रस्त्याने पायी चालत दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व शॉपिंग मॉलमध्ये जाऊन प्लास्टिक बंदीवरील महाराष्ट्र शासणाच्या निर्णयाबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या जमा करण्याची विनंती करीत होते. दुकानदारांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःजवळील असलेल्या प्लास्टिक पिशव्या कार्यकर्त्यांच्या हातात स्वाधिन केल्या. काही तासांतच सत्तर किलो प्लास्टिक जमा झाले. कार्यकर्त्यांनी ते महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडे सुपुर्त केले. 

नगरसेवक नाना काटे म्हणाले, " रहाटणी पिंपळे सौदागर परिसर प्लास्टिक मुक्त होण्यासाठी मागिल आठ महिण्यांपासून आंम्ही प्रयत्न करीत आहे. त्याकरीता वीस हजार कापडी पिशव्यांचे वाटपही केले आहे. महाराष्ट्र शासनाने आजपासून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तेंव्हा दंड व मनस्ताप टाळण्यासाठी आंम्ही लोकांकडून प्लास्टिक जमा करून आरोग्य विभागाकडे सुपुर्त केले. "

पदयात्रा चालु असताना तेथून पोतराज आणि त्याचे कुटुंब चालले होते. प्लास्टिक बंदीच्या समर्थनार्थ निघालेल्या पदयात्रेत ते ही काही काळ सहभागी झाले व त्यांनी दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या गोळा करून नाना काटे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडे जमा केल्या. 

संतोश मस्कर, सिध्दार्थ नाईक, सचिन देसाई, संतोश मिश्रा, विक्रम मोहिते, पराग त्यागी, अंबरीश जोशी, तुषार जळमकर, अशोक सोनवने, अभय चितळे, सतिश होळकर यांच्यासह सोसायटींमधील कार्यकर्त्यांनी पदयात्रा यशस्वी केली.

Web Title: Seventy kg plastic collect by way of pedestrians in Pimpale Sadadagar