#SexEducation पालकांनी मुलांचे मित्र बनावे

Sex-Education
Sex-Education

पुणे - पालक आणि मुलांमधील मैत्रीपूर्ण संवाद हरवला आहे. पालकांनी मुलांचे मित्र-मैत्रीण व्हावे जेणेकरून मुले लैंगिक समस्यांबाबत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतील. पाल्याच्या सर्व शंकांचे निरसन पालकांनी केले, तर मुलांची दिशाभूल होणार नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी सकाळ फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून पालकांना दिला. 

किशोरवयीन मुलींमधील गर्भपाताचे वाढते प्रमाण या विषयावर आयोजित ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी देशपांडे व स्टेप अप संस्थेच्या संचालिका गौरी वेद यांनी मार्गदर्शन केले. 

या वेळी वेद म्हणाल्या, ‘‘ज्या मुलांचा पालकांसोबत संवाद होत नाही, अशांमध्ये हे प्रकार जास्त घडतात. मुले वयात येतानाच पालकांनी मुलांना वयात येणे म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय हे समजावून सांगितले पाहिजे.

किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल पालकांनी मुलांना चर्चेद्वारे समजावून सांगावेत. पालक आणि मुलांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मुलांचे प्रबोधन होऊन बऱ्याच समस्या मार्गी लागतील.’’

वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भपात न केल्यास सेप्टिक (गुंतागुंतीमुळे) गर्भपात होऊ शकतो. यामुळे संसर्ग होऊन गर्भाशयातील सर्व नलिका ब्लॉक होऊ शकतात. यामुळे पुढे गर्भधारणेला त्रास होतो. हे टाळण्यासाठी सेफ्टी एज्युकेशन महत्त्वाचे आहे. मुले सहावी-सातवीत असल्यापासूनच पालकांनी संवाद सुरू केला पाहिजे. आई-वडिलांना घरी मुलांसोबत संवाद साधता येत नसेल तर तज्ज्ञांची मदत घ्यावी. पॉक्‍सो कायद्यांतर्गत अनेक खोट्या तक्रारी दाखल होत असतात. त्यामुळे या कायद्यातही बदल करण्याची आवश्‍यकता आहे.  
- डॉ. मीनाक्षी देशपांडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com