छुप्या कॅमेऱ्याने केला महिलेचा सेक्स व्हिडिओ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सहमतीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून चित्रीकरण केले. तसेच, ते महिलेच्या मित्राला दाखवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रकमेची मागणी केली.

पिंपरी (पुणे) : सहमतीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून चित्रीकरण केले. तसेच, ते महिलेच्या मित्राला दाखवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रकमेची मागणी केली. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार पुण्यातील वकिलासह त्याची महिला अशील व एकावर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
ऍड. अभिजित सरवटे याच्यासह त्याची अशील मानसी खेर व बेडरुममध्ये कॅमेरा बसविण्यासाठी मदत करणारा साथीदार अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळे निलख परिसरातील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार 2016 पासून सुरू होता. फिर्यादी महिलेचे तिच्या एका मित्राबरोबर शारीरिक संबंध होते. त्याचे चित्रण करण्यासाठी आरोपींनी कट रचला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sex video shoot through hidden camera