अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी ओतूर येथील युवकाला अटक

crime
crime

ओतूर (जुन्नर) - येथील पोलिसांनी तीन वर्ष वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार (पास्को) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अठरा वर्षी तरुणाला अटक केली. याबाबत ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सुरज बनसोडे व पोलिस उपनिरिक्षक सतीश डौले यांनी माहिती दिली. ओंकार मच्छिंद्र भोईर वय.18 असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंडित मुलीला पिंपरी, पुणे येथून तिचे नातेवाईक मच्छिंद्र गणपत भोईर यांनी शनिवार ता.20 रोजी ओतूर येथे मागे लागली म्हणुन आणले होते. त्यानंतर सोमवारी ता.22 रोजी परत पिंपरी, पुणे येथे पिडित मुलीच्या घरी नेऊन सोडले. त्यानतंर झोपेतून उठल्यावर मुलीच्या दुखु लागल्याने आणि लघवी करताना रक्त पडल्यामुळे तिच्या आईला संशय आला. मुलीला प्रेमाने विचारले असता झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर खाजगी व नतंर ससून रुग्णालयात पिंडित मुलीला उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरानी तपासणी केल्या नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. 

याबाबत ओतूर पोलिसात पिडिंत मुलीच्या आईने मंगळवार ता.23 रोजी फिर्याद दाखल केली असुन, त्यानुसार आज बुधवारी ता.24 रोजी पहाटे पोलिसानी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक सुरज बनंसोडेच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सतीश डौले करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com