दैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.कॉम.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला इंग्रजी माध्यम अवघड जात होते. परिणामी, ती गैरहजर राहत होती. त्यामुळे या तरुणीच्या आईने फरीन फारुख शेख (रा. कोंढवा) यांची भेट घेतली. फरीनने तिच्या अंगात दैवी शक्‍ती येत असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर कोंढव्यातील मंडप व्यावसायिक शफीक रफीक शेख (वय 28) याच्या घरी नेले. तेथे शफीकने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, त्याच्याकडे कामास असलेल्या अल्पवयीन मुलाने तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला धमकावून लैंगिक अत्याचार केला. 

एक वर्षापासून हा प्रकार सुरू होता. ही बाब पीडित मुलीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्याच्या मदतीने पोलिसांना सांगितली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेसह दोघा आरोपींना अटक केली; तर अन्य एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. हडपसर विभागाचे पोलिस उपायुक्‍त प्रकाश गायकवाड आणि सहायक आयुक्‍त सुनील देशमुख यांच्या सूचनेनुसार पात्रुडकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र जगताप, उपनिरीक्षक अमोल गवळी, राजेंद्र घाटगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 
Web Title: Sexual harassment on girls by divine power reason