चिमुकलीवर अत्याचार करून घेतला नाकाचा चावा

girl
girl

औंध (पुणे) : तीन वर्षीय चिरमुडीवर लैंगिक अत्याचार करून व तिच्या नाकाचा चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पाषाण येथे घडली. याप्रकरणी चतुःश्रूंगी पोलीसांनी शंभूकुमार दुखी राय (रा.मुळ गाव - मुरलीखा,राजनगर जि.मधुबनी बिहार) या तरूणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 27 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाषाण येथे एका चाळीत भाड्याने राहत असलेल्या कुटूंबातील ही चिमुरडी घरी खेळत असताना पाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने तीला खाऊचे आमिष दाखवून बाहेर नेले. जवळच असलेल्या गवत व झूडूपात नेऊन अत्याचार केले. हा प्रकार केल्यानंतर तिला तिथेच सोडून तो निघून गेला. हा प्रकार बाजूलाच खेळत असलेल्या मुलांच्या लक्षात आल्यानंतर घरी कळवण्यात आले.

ही माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी येऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सदरील बालिकेवरील अत्याचारामुळे तीला असह्य वेदना होत असल्याने रडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी शंभूकुमारने तीच्या नाकाचा चावा घेऊन तीला जखमी केले. यात बालिकेच्या नाकाचा तुकडा पडला असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही दिवसापूर्वीच हिंजवडी येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मूळचा बिहार राज्यातील हा तरूण पाषाणमधील एका वृध्दाश्रमात कामाला होता. घटनेच्या दिवशी त्याने दारू प्राशन करून हे कृत्य केल्याचे शेजारील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

यापूर्वीही शंभूकुमारने दारू  पीऊन गाडीचा अपघात केला होता याबद्दल त्याला नागरीकांनी चोपही दिला होता. या ठिकाणी असलेल्या एका वृध्दाश्रमात तो ऑफीसबाॅय म्हणून कामाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेसंदर्भात पोलीस सदर वृध्दाश्रमात चौकशीसाठी गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले असून त्याला कठोर शिक्षा होईल यासाठी योग्य तो तपास करण्यात येत असल्याचे चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com