वडीलासह कुटुंबातील सदस्यांकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बंडगार्डन पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, समुपदेशनामध्ये उघड झाला प्रकार
sexually Abuse of minor girl by father and family members pune
sexually Abuse of minor girl by father and family members pune sakal

पुणे : अल्पवयीन मुलीवर वडीलासह नात्यातील लोकांनीच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शाळेमध्ये घेण्यात आलेल्या समुपदेशनाच्या सत्रामध्ये संबंधित मुलीने माहिती दिल्यानंतर हि घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पिडित मुलीचा वडील, अल्पवयनी भाऊ, आजोबा व चुलत मामा यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्‍सो) बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी हि 11 वर्षांची असून बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहात असून जवळच्याच एका शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. तर फिर्यादी महिला या समुपदेशक आहेत.

त्या नेहमीप्रमाणे संबंधित शाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी विद्यार्थ्यांना "गुड टच, बॅड टच' याविषयीची माहिती देत होत्या. त्यावेळी संबंधित मुलीने फिर्यादीशी संपर्क साधून तिच्याबाबत घडलेली घटना सांगितली. मुलगी व तिचे कुटुंबीय मुळचे बिहार येथील आहे. मागील चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. प्रारंभी वडीलांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर 14 वर्षाच्या भावाने पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, आजोबा व चुलत मामानेही पिडीत मुलीशी गैरवर्तन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com