तोच चंद्रमा नभात...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अवीट गाण्यांची मैफल रंगली
शांताबाई शेळके यांच्या ‘आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे.. स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे....’, ‘पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे...’, ‘ही चाल तुरूतुरू, उडती केस भुरूभुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली...’, मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा...’, ‘रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला...’ या गाण्यावर प्रेक्षकांना टाळ्यांचा वर्षाव केला. कार्यक्रमाची सांगता ‘मराठी पाऊल पडते पुढे...’ या गीताने झाली.

पुणे - ‘तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी.. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी....’, ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे.. पाऊल थकले, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे.....’ अशा सदाबहार गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

निमित्त होते स्व. शांताबाई शेळके यांच्या काव्यप्रतिभेवर आधारित ‘सकाळ’ आयोजित ‘शब्दसम्राज्ञी’ या कार्यक्रमाचे. प्रत्येक गाण्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे रिअल इस्टेट पार्टनर श्री राम बिल्डर्स होते. फूड पार्टनर दूर्वांकुर डायनिंग हॉल, सहयोगी प्रायोजक श्री विश्‍वानंद आयुर्वेदिक चिकित्सालय आणि सन राईज एडव्हर्टायजिंग ॲण्ड इव्हेन्ट हे कार्यक्रमाचे आयोजक होते.

कार्यक्रमाची संकल्पना संजय बर्वे, संहितालेखन शंतनू जोशी यांची होती. अभिनेते सुनील बर्वे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी निवेदन केले. हृषीकेश रानडे, मधुरा दातार, स्वप्नजा लेले आणि चैतन्य कुलकर्णी यांनी शेळके यांची गाणी सादर केली. अभिनेत्री शर्वरी जेमेनीस व ऐश्‍वर्या काळे यांनी नृत्य सादर केले. त्यांना विवेक परांजपे, राधिका अंतुरकर, शैलेश देशपांडे, यश भंडारे, केदार मोरे, अमित कुंटे आणि रोहन वनगे यांनी साथसंगत दिली. या वेळी श्री राम बिल्डर्सचे संचालक अजित कुलकर्णी, नितीन कुलकर्णी व ऋत्विक कुलकर्णी, ऐश्वर्या कुलकर्णी, दूर्वांकुरचे संचालक श्‍याम मानकर, श्री विश्‍वानंद आयुर्वेदिक चिकित्सालयाचे अनिल बनसोडे व नीलम बनसोडे, सन राइजचे संजय बर्वे आणि ‘सकाळ’चे बिझनेस (हेड इव्हेंट) राकेश मल्होत्रा आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shabdasamragyi Event