कचराकुंडीसाठी मारलेले शेड पडले की पाडले?

रमेश मोरे 
शनिवार, 28 जुलै 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्यावरील संतगोरोबा कुंभार उद्यानामागील बाजुस रस्त्यावर येणारा कचऱ्याला प्रतिबंध करण्यासाठी येथील दोन कचराकुंड्या रस्त्याकडेला मागे हटवुन कचराकुंड्या भोवती पत्राशेड मारण्यात येणार होते. या रस्त्यावर दोन कचराकुंड्या आहेत. नागरीक येता जाता दुचाकी, चारचाकी वहानातुन भिरकवलेला कचरा कुंडीत न टाकता कचराकुंडी भोवती भिरकवतात परिणामी कचरा रस्त्यावर येतो.

रस्त्यावर येणाऱ्या कचऱ्यातुन विद्यार्थी नागरीकांना ये जा करावी लागते तर आरोग्य विभागाच्या सफाई कामगारांना रस्त्यावर आलेला कचरा रोज हाताने भरून कुंडीत टाकावा लागतो. सडलेल्या भाजीचा कचरा, हॉटेल व्यावसायिकांनी टाकलेले शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ यातच पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरते. चाकरमानी मंडळी, शाळकरी विद्यार्थी यांना सकाळी व रात्री रस्त्यावर येणाऱ्या कचऱ्यातुन मार्ग काढावा लागतो. येथील कचरा कुंड्या मागे हटवुन कचरा रस्त्यावर येवु नये यासाठी येथे आरोग्य विभागाच्या सांगण्यावरून स्थापत्य विभागाकडुन पत्राशेड मारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

येथील राडारोडा हटवुन उभारण्यात येणारे शेडचे उभे केलेले लोखंडी पत्रे सध्या गेली दहाबारा दिवसांपासुन जमिनीवर पडलेले आहेत.याबाबत स्थापत्य विभागाकडे विचारणा केली असता स्थानिक अभियंत्याकडुन आरोग्य विभागाकडुन येथील कचरा रस्त्यावर येवु नये यासाठी पत्राशेडची मागणी केली असता ते उभे करून देण्याचे काम आम्ही केले मात्र दुस-या दिवशी शेड पडले की कोणी पाडले हे माहित नाही असे सांगण्यात आले. याबाबत आरोग्य विभागाकडुन काळजी घेतली नसल्याचे स्थापत्य विभागाकडुन सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात स्थानिक आरोग्य निरिक्षकाची दुसऱ्या प्रभागात बदली झाल्याने गेली पंधरा दिवसापासुन येथील पत्राशेडचे पत्रे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले आहेत. उभे केलेले पत्राशेड पाडले की पडले अशी चर्चा नागरीकांमधुन सुरू आहे.

गेली चार दिवसापासुन जुनी सांगवी प्रभागाचा कार्यभार माझ्याकडे आला आहे. वरिष्ठांशी चर्चा करून येथे सिमेंट विटा लावुन कुंड्या मागे घेवुन पत्राशेड लावण्यात येईल यामुळे रस्त्यावर कचरा येणार नाही.
-संजय मानमोडे, आरोग्य निरिक्षक जुनी सांगवी प्रभाग

Web Title: shade for garbage fell down