शहाजहानच्या राजवटीतील मोहरेसाठी मोजले २ लाख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे - अकरा ग्रॅम वजनाची सोन्याची मोहर (नाणे) घेण्यासाठी एका इतिहासप्रेमीने दोन लाख रुपये मोजले. ही मोहर १६ व्या शतकातील शहाजहानच्या राजवटीतील आहे.  

इसवीसनपूर्व ६०० वर्षांपूर्वीपासून ते आता चलनात असणाऱ्या नाण्यांचा लिलाव नुकताच कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल या ठिकाणी झाला.  ‘इंपिरिअल ऑक्‍शन’ कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या लिलावात दोनशेहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. पन्नास लाखांहून अधिक रुपयांची नाणी या लिलावात विकण्यात आली. यामध्ये चंद्रगुप्त मौर्य, नरसिम्हा गुप्ता तसेच सोळाव्या शतकातील शहाजहान आदींच्या राजवटीत पुरातन नाण्यांचा समावेश होता.

लिलाव करण्यात आलेली नाणी
 शहाजहान राजवट (इ.स.१६२८ ते १६५८) : २ लाख रुपये (सोन्याची मोहर)
 नरसिम्हा गुप्ता राजवट (इ.स.५१८ ते ५३०) : १ लाख ३० हजार (सोन्याचे दिनार)
 चंद्रगुप्त मौर्य राजवट (इ.स.३७५ ते ४१५) : १ लाख २५ हजार (सोन्याचे दिनार)

या लिलावात ४०० लॉट्‌स विकले गेले असून, त्यातून ५० लाख रुपयांपर्यंतची विक्री झाली आहे. बऱ्याचदा शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनाच अशी नाणी विकत घेण्याची संधी मिळते. परंतु, ही सर्वांना उपलब्ध व्हावी, यासाठी या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. 
- पुंडलिक बलिगा, संचालक इंपिरिअल ऑक्‍शन

Web Title: Shahajahan Mohar

टॅग्स