पुणे: चाकणजवळ चकमकीत गुंड शाम दाभाडे ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

तळेगाव दाभाडे - तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी फरार असलेला गुंड शाम दाभाडे व त्याचा सहकारी धनंजय शिंदे यांना आज (मंगळवार) सकाळी पोलिसांनी चकमकीत ठार केले. 

तळेगाव दाभाडे - तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी फरार असलेला गुंड शाम दाभाडे व त्याचा सहकारी धनंजय शिंदे यांना आज (मंगळवार) सकाळी पोलिसांनी चकमकीत ठार केले. 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये कुख्यात गुन्हेगार शाम दाभाडे आणि धनंजय शिंदे ठार झाले आहेत. चाकणच्या वरसाई पवनचक्कीच्या डोंगरात दाभाडे आणि शिंदे लपल्याची पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यानंतर वेढा घालून त्यांना शरण यायला सांगितल्यावर दाभाडे आणि शिंदे यांनी पोलिसांवर 9 राऊंड फायर केले. या प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले. त्यांच्याकडे चार पिस्तुल, एक कट्टा आणि ४२ राऊंड सापडले आहेत.

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी हा आरोपी होता. शेळके यांचा पूर्ववैमनस्यातून खून झाला होता.

Web Title: Sham Dabahde killed in police encounter at Talegaon Dabhade