शमशुद्दीन इनामदार यांना रॉयल फोटोग्राफी क्लबचा सन 2019 चा विशेष पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

बारामती  : येथील रॉयल फोटोग्राफी क्लबच्या तीने देण्यात येणारा सन 2019 चा विशेष पुरस्कार काल शमशुद्दीन इनामदार यांना यवतमाळचे संजय ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुनील जाधव यांनाही या प्रसंगी योगेश दुर्गे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

बारामती  : येथील रॉयल फोटोग्राफी क्लबच्या वतीने देण्यात येणारा सन 2019 चा विशेष पुरस्कार काल शमशुद्दीन इनामदार यांना यवतमाळचे संजय ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुनील जाधव यांनाही या प्रसंगी योगेश दुर्गे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

रॉयल फोटोग्राफी क्लबच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी छायाचित्रणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या छायाचित्रकारांना गौरविण्यात येते. बारामती, इंदापूर, दौंड, फलटण, जेजुरी, यवत, मोरगाव, नीरा, सुपे, भिगवण, कर्जत, राशीन यासह पुणे परिसरातून दीडशेहून अधिक छायाचित्रकार या प्रसंगी उपस्थित होते. 

या प्रसंगी रामेश मेढेकर (उस्मानाबाद) यांनी फोटोग्राफीसाठी लागणारी सॉफ्टवेअर्स व त्यांचा वापर, डॉ. पोपटराव मोहिते यांनी टीम व एकजूट या बाबत तर मोहित खळदे यांनी छायाचित्रणाची कला या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

रॉयल फोटोग्राफी क्लबचे अध्यक्ष फैय्याज शेख यांनी क्लबच्या वाटचालीची माहिती प्रास्ताविकात दिली. सभासदांचा एक लाखांचा विमा उतरविण्याचीही घोषणा त्यांनी या वेळी केली. संजय ठाकरे यांनी सहकारी तत्त्वावरील फोटोग्राफर प्लॅटफॉर्म ही नवीन कंपनी स्थापन करीत असल्याचे या वेळी सांगितले. सुरेश काळे यांनीही मार्गदर्शन केले. महेश जाधव, अभिजीत बर्गे यांच्यासह क्लबच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. 

 

 

Web Title: Shamshuddin Inamdar gets a special award for the year 2019 from the Royal Photography Club