...अन्‌ उघडला दिल्ली दरवाजा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे - पेशवाईच्या काळात पुण्यातील शनिवार वाड्यातून दिल्लीच्या राजकारणावर हुकूमत गाजविण्यात आली. या ऐतिहासिक वाड्याचा २८७ वा वर्धापन दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. 

पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर आदी उपस्थित होते. या वेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. 

शेटे म्हणाले, ‘‘शनिवार वाड्याचे भूमिपूजन १० जानेवारी १७३० रोजी  झाले होते, तर २२ जानेवारी १७३२ रोजी वाड्याची वास्तुशांत करण्यात आली. शनिवार वाडा हा मराठेशाहीचा मानबिंदू आहे. वाड्यातील कारंजे व कात्रजपासून आणलेली दगडी जलवाहिनी आजही आश्‍चर्याची बाब आहे.’

शनिवार वाड्याचा २८७ वा वर्धापन दिन दिमाखात होत आहे. मागील काळात ‘शनिवार वाडा हटाओ’, ही मोहीम झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. वाड्यातील अनेक गोष्टींची दुरवस्था झाली असून, मेघडंबरीच्या लाकडाला कित्येक महिन्यात पॉलिशही करण्यात आलेले नाही. 
- उदयसिंह पेशवा, पेशव्यांचे वंशज 

शनिवार वाड्याची उभारणी 
  भूमिपूजन - १० जानेवारी १७३० 
  वास्तुशांती - २२ जानेवारी १७३२  

Web Title: Shanivarwada Delhi Door