दिल्ली दरवाजा उघडतो तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांनी बांधलेली वास्तू 
शनिवारवाड्याचा २८५वा वर्धापन दिन
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशव्यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली अर्पण करून पेढे वाटप
चौघड्यांचे स्वर, रांगोळी अन्‌ सेल्फीही
इतिहासप्रेमी पेशवेकालीन वैभवाच्या आठवणीत रमले
बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजन

प्रतिमांचे पूजन...
पेशव्यांचे वंशज महेंद्रसिंह पेशवे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक हेमंत रासने, मुक्ता टिळक, रूपाली पाटील यांनी प्रतिमांचे पूजन केले तर प्रा. मोहन शेटे यांनी पेशव्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला. या वेळी देवदेवेश्‍वर संस्थान-पर्वती आणि कोथरूडचे विश्‍वस्त रमेश भागवत, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, खजिनदार श्रीकांत नगरकर, सदस्य मोरेश्‍वर गांगल, पुरुषोत्तम काशीकर, चिंतामणी क्षीरसागर उपस्थित होते.

Web Title: Shaniwar wada gate open