शास्तीकरमाफीसाठी शंख, घंटानाद आंदोलन

महापालिका भवन, पिंपरी - अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण आणि संपूर्ण शास्तीकरमाफी, या प्रमुख मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले.
महापालिका भवन, पिंपरी - अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण आणि संपूर्ण शास्तीकरमाफी, या प्रमुख मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले.

पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा, तसेच नागरिकांना संपूर्ण शास्तीकरमाफी मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले.

आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, स्वराज इंडिया, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, भारिप बहुजन महासंघ आदी प्रमुख पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी महापौर कविचंद भाट, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक श्‍याम लांडे, अमित गावडे, पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, मच्छिंद्र तापकीर, मानव कांबळे, मारुती भापकर, प्रल्हाद कांबळे आदी या वेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नऊ जानेवारीला शहरात आले होते. तेव्हा शास्तीकराची धास्ती १५ दिवसांत घालविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. या आश्‍वासनाला अनुसरून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी महापालिका भवनासमोर ‘काउंट डाउन’ आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेली १५ दिवसांची मुदत २४ जानेवारीला संपली. मात्र, शास्तीकर माफीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आज घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com