'चित्रा वाघ घाबरल्या होत्या, त्यामुळे सोडला पक्ष'

ज्ञानेश सावंत
रविवार, 28 जुलै 2019

सत्ताधाऱ्यांनी चौकशीची भीती दाखवल्यानेच त्या घाबरल्या. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडत असल्याचे मला सांगितले. मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करतात. चित्रा वाघ यांच्या पतीवर एसीबी चौकशी करण्याचा दबाव टाकल्यानेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

पुणे : चित्रा वाघ यांचे पती किशोर यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरल्या होत्या. त्याबाबत वाघ मला भेटल्या आणि बचावासाठी पक्ष सोडून जात असल्याचे मला कळविले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असा खळबळजनक वक्तव्य पवार यांनी केले.

शरद पवार यांची आज (रविवार) सकाळी पुण्यात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर आरोप केले. सध्या राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी सरकारवर आरोप करत लोकप्रतिनिधींना धाक दाखवून पक्ष प्रवेश केला जात असल्याचे म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी त्यांच्या पतीला ट्रॅपमधून सोडविण्यासाठी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यावर आज बोलताना पवार यांनी सांगितले, की सत्ताधाऱ्यांनी चौकशीची भीती दाखवल्यानेच त्या घाबरल्या. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडत असल्याचे मला सांगितले. मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करतात. चित्रा वाघ यांच्या पतीवर एसीबी चौकशी करण्याचा दबाव टाकल्यानेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar clears why Chitra Wagh left NCP