Sharad Pawar : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी शरद पवार दाखल; म्हणाले मी स्वत:...

Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय अद्याप बदललेला नाही. याविरोधात पुण्यात आंदोलन सुरू आहे. आज रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली आहे. यावेळी काँग्रेसनेते अतुल लोंढेही उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवास साधला. शरद पवार म्हणाले की, मला, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सी.जी. पाटील यांनी पत्र लिहिलं. ते पत्रात म्हणाले की, कृषी विद्यापीठांचे आंदोलन करत आहेत. त्याचा विद्यापीठाच्या कामावर परिणाम होत आहे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. तरी आपणास विनंती आहे की, तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून प्रश्न सोडवावा. यासाठी राज्य सरकारचे सचिव, लोकसेवा आयोगाचे अधिकारी, तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर प्रश्न सोडवावा.

दरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करताना पवार म्हणाले की, माझ्याकडे हा प्रश्न आधीच आला आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, विद्यार्थी प्रतिनिधी, मी स्वत:, विद्यापीठाचे कुलगुरू, एमपीएससीचे पदाधिकारी बैठक घेऊ. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आंदोलनस्थळावरून फोनवर संवाद साधला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यास तयार असल्याचं म्हटलं.

याव्यतिरिक्त पवार म्हणाले की, सरकारला विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावाच लागले. यासाठी मी स्वत: विद्यार्थ्यांसोबत येणार असल्याचं म्हटलं. यावर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांतच बैठक घेण्याचं मान्य केलं. विद्यार्थ्यांकडून देखील पाच प्रतिनिधींची नावे शरद पवार यांनी देण्यात आली. मात्र आयोगाने नोटीस जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com