सत्तांतराची ताकद शरद पवार आणि राष्ट्रवादीतच : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

देशातील क्रमांक एकचे राज्य अधोगतीकडे चालले आहे. सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. देशात दर 
75 मिनिटाला 1 बलात्कार आणि 60 मिनिटाला एक विनयभंग होत आहे. ही सरकारची ओळख झाली आहे.

पुणे : सध्या न्यायव्यवस्थेवर शंका उपस्थित केली जात आहे. युवकांचा विश्वासघात केला गेला आहे. हीच तरुणाई आता भाजपला सत्तेच्या बाहेर फेकण्याचे काम करेल. सध्या लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. सत्तांतराची ताकद शरद पवार आणि राष्ट्रवादीतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

जयंत पाटील यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्यभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या सरकारच्या पापण्यांना पाणी दिसत नाहीत. त्यामुळे आता आमचा सरकारवर विश्वास राहिलेले नाही. राज्यातील मध्यमवर्गीय लोक महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. शेती प्रश्नांबरोबरच मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर संघर्ष केला जात आहे. 

देशातील क्रमांक एकचे राज्य अधोगतीकडे चालले आहे. सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. देशात दर 
75 मिनिटाला 1 बलात्कार आणि 60 मिनिटाला एक विनयभंग होत आहे. ही सरकारची ओळख झाली आहे. पक्षात 'परफॉर्ममन्स काऊंट' झाला पाहिजे तरच पक्षाला पुढच्या 50-100 वर्षे कोणी हलवू शकणार नाही, असेही पाटील म्हणाले. 

Web Title: Sharad Pawar has Power of to change Government says Jayant Patil