शरद पवार यांच्या सभेने प्रचाराची सांगता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उतरण्याची शक्‍यता असून, पवार यांनी पुण्यात एक तरी सभा घ्यावी, यासाठी पक्षाचे पदाधिकारी आग्रही आहेत. निवडणुकीतील पक्षाच्या प्रचाराची सांगता पवार यांच्या सभेने होणार आहे. येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी ती होईल, असे पक्षातील सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाचे आव्हान असताना महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत पक्षाच्या खासदारांसह माजी मंत्र्यांना उतरविण्याचे नियोजन पक्षाच्या वतीने करण्यात आले. शहरातील विविध 41 प्रभागांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी 18 सभा घेण्यात येणार असून, त्यासाठी पक्षाचे नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सर्वाधिक सभा होणार आहेत. येत्या सोमवारपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये या सभा घेण्यात येतील, असेही सांगण्यात आले. 

पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण म्हणाल्या, ""निवडणुकीत पवार यांची पुण्यात एक सभा व्हावी, यासाठी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मात्र, त्यांची वेळ अद्याप निश्‍चित झालेली नाही. त्याबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. पक्षाच्या अन्य नेत्यांच्याशी सभा होणार असून, त्याचे नियोजन करण्यात येत आहे.'' 

Web Title: sharad pawar last Prachar Sabha