शरद पवार यांच्याकडून झाला 'हा' अनोखा विक्रम

मिलिंद संगई
Thursday, 23 July 2020

खासदार सुप्रिया सुळे यांनीच या बाबत त्यांच्या फेसबुकवर ही माहिती दिली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून 1967 मध्ये शरद पवार सर्वात प्रथम आमदार म्हणून निवडून गेले होते, तेव्हापासून राजकीय जीवनात कोणत्याच निवडणूकीत त्यांचा पराभव झाला नाही

बारामती : भारतीय राजकीय इतिहासात प्रदीर्घ काळ राजकारण केलेल्या काही मोजक्या व्यक्तिमत्वांमध्ये एक असलेल्या शरद पवार यांचा एक नवीन विक्रम झाला आहे. विधिमंडळ व संसद मिळून त्यांनी आतापर्यंत सोळा वेळ शपथ घेतली आहे. काल त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची घेतलेली  शपथ त्यांच्या संसदीय कारकीर्दीतील तब्बल सोळावी होती. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार सुप्रिया सुळे यांनीच या बाबत त्यांच्या फेसबुकवर ही माहिती दिली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून 1967 मध्ये शरद पवार सर्वात प्रथम आमदार म्हणून निवडून गेले होते, तेव्हापासून राजकीय जीवनात कोणत्याच निवडणूकीत त्यांचा पराभव झाला नाही. देशाच्या सर्व सभागृहात त्यांनी काम केलेले आहे. राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेसह लोकसभा व राज्यसभेतही शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून निवडणूकीपासून दूर राहत त्यांनी राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग स्विकारला आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण व कृषी मंत्री, केंद्रात विरोधी पक्ष नेते यासह दोन डझनहून अधिक महत्वाच्या संस्था व संघटनांचे प्रमुखपद त्यांनी भूषविले आहे. देशातील एक ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. राज्य व राष्ट्रीय राजकारणात 50 वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे कार्यरत असलेले नेते म्हणून त्यांचा परिचय आहे. 

भाजयुमो आक्रमक; जय श्रीरामचा नारा असलेली दहा लाख पत्रे शरद पवारांना पाठविणार

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाविकासआघाडीची मोट बांधण्याचे काम शरद पवार यांनीच केले होते व भाजपला 105 जागा मिळूनही सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम शरद पवार यांनी केले. शरद पवार दुस-यांदा राज्यसभेवर जात आहेत.

शरद पवार यांची झळाळती कारकिर्द....
•    सहा वेळा विधानसभेत आमदारकीची शपथ
•    एक वेळा विधानपरिषदेत शपथ
•    सात वेळा लोकसभा सदस्यत्वाची शपथ
•    दोन वेळा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar takes 16th oath as peoples Representative