पुण्याचा मला अभिमान: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मी तीन जणांना माझा आदर्श मानतो. शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती एकच असतो म्हणून त्यांच्या पगडी, टोपी सर्वसामान्य नागरिकांनी घालायच्या नसतात. डॉ. आंबेडकर हे कधी टोपी किंवा पगडी घालत नसत म्हणून ज्योतिबा फुलेंच्या आतापर्यंत कार्य पाहता मी त्यासाठी पुरस्कार केला आणि पगडीचा मी उल्लेख केला.

पुणे : पुणेरी पगडी ऐवजी महात्मा फुले यांची पगडी आणि भेटवस्तूंऐवजी पुस्तके भेट द्यावीत. पुण्यावर टीका असा काही भाग नाही, पुण्याचा मला अभिमान आहे, मी पुण्यात शिकलोय, असे पगडी वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या हल्लाबोल आंदोलनात शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी देण्याचे म्हटले होते. यावर वादविवाद झाला होता. या प्रकरणी आज (शनिवार) शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार म्हणाले, की मी तीन जणांना माझा आदर्श मानतो. शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती एकच असतो म्हणून त्यांच्या पगडी, टोपी सर्वसामान्य नागरिकांनी घालायच्या नसतात. डॉ. आंबेडकर हे कधी टोपी किंवा पगडी घालत नसत म्हणून ज्योतिबा फुलेंच्या आतापर्यंत कार्य पाहता मी त्यासाठी पुरस्कार केला आणि पगडीचा मी उल्लेख केला. पुण्यावर टीका असा काही भाग नाही पुण्याचा मला अभिमान आहे. मी पुण्यात शिकलोय. माझी भूमिका वैयक्तिक किंवा कोणत्या वर्गाच्या विरोधात मत मांडणे अशी नव्हते.

Web Title: Sharad Pawar talked about puneri pagadi