Sharad Pawar : "दोन्ही डोळे बंद ठेवले तर..." ; शरद पवारांनी सांगितला 'तो' खास किस्सा!

Sharad Pawar
Sharad Pawar

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशन संदर्भात एक खास किस्सा सांगितला आहे. शरद पवार इंदापूर शहरातील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार शाब्दिक टोलेबाजी केली त्यामुळे एकच हशा पिकला होता. यावेळी शरद पवार यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे आभार देखील मानले. 

शरद पवार म्हणाले, "काही महिन्यांपूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांना दिसण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायची गरज आहे. मी त्यांना म्हटलं आत्ताच करून टाका. मात्र डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करता येणार नाही. तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले होणार नाही. त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे."

Sharad Pawar
ShivSena Row: आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
Sharad Pawar
Shivsena Row : उद्धव ठाकरेंचं बाळासाहेबांच्या पावलावर पाउलं; ओपनकारमध्ये केलं कार्यकर्त्यांना संबोधित

"डॉक्टरांनी सांगितले की पाळीपाळीने आम्ही तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करू. आता एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केले. त्यांनी डोळ्यात नक्की काय बसवलं हे मला माहित नाही. परंतु मला आता सर्वकाही व्यवस्थित दिसतं, त्यामुळे कोण काय करतं हे सांगायची आणि माहिती घ्यायची गरज पडत नाही", असे शरद पवार म्हणाले. 

Sharad Pawar
Shivsena Row : EC, ED अन् CBI नंतर भाजपचं पुढचं लक्ष...; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com