Sharad Pawar : शरद पवार यांचे बारामतीत जोरदार स्वागत

उद्योगपती रवींद्र काळे यांनी खास गुलाबांच्या फुलांचा आणलेला हार पवार यांना घालून त्यांचे स्वागत
sharad pawar withdraw his resign as ncp chief warm welcome to Baramati politics
sharad pawar withdraw his resign as ncp chief warm welcome to Baramati politicssakal

बारामती : राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आज बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. शरद पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

उद्योगपती रवींद्र काळे यांनी खास गुलाबांच्या फुलांचा आणलेला हार पवार यांना घालून त्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माळेगावचे संचालक योगेश जगताप यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्त्यांना पाहून पवार गाडीतून उतरुन खाली आहे आणि त्यांनी शाल व हाराचा स्विकार केला. प्रसन्न चेह-याने त्यांनी दोन मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला व ते घराकडे मार्गस्थ झाले. राजीनाम्याच्या निर्णयानंतर बारामतीत पवार यांचे स्वागत केल्यानंतर कार्यकर्त्यांतही उत्साहाचे वातावरण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com