शरद पवार यांच्या पायाला इजा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला इजा झाली असून, 15 मेपर्यंत त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांतील त्यांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. 

पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पवार मुंबईला रवाना झाले. दरम्यान, त्यांच्या पायाला इजा झाल्याने त्यांना पुढील पंधरा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार आहेत. मात्र, 4 मे रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथील कार्यक्रम व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथे 8 व 9 मे रोजी होणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला मात्र उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

Web Title: Sharad Pawar's foot injury