Vidhan Sabhha 2019 : चेतन तुपेंच्या प्रचारासाठी उद्या पुण्यात शरद पवारांची सभा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabhha 2019 :  हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्या (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी ५ वाजता स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे नाटयगृहासमोर सभा होणार आहे. रविवारी खासदार डॅा. अमोल कोल्हे यांच्या रोड 'शो' ला उत्फुर्त प्रतिसाद लाभल्याने तुपे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

''अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारणाऱ्या शिवरायांचा आदर्श राज्यकर्त्यांनी ठेवायचा असतो, परंतु भाजप सरकारने मात्र बहुजन समाजाच्या तोंडाला कायम पानेच पुसली. संविधानविरोधी, जातीयवादी या सरकारच्या विरोधात संपूर्ण बहुजन समाज एकवटला असून त्यांच्या पाठींब्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात बदल नक्कीच घडून येईल, असा विश्वास हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी व्यक्त केला. 

सोमवारी प्रभाग क्रमांक २२, २३ व २४ मध्ये महाआघाडीचा जोरदार प्रचार करण्यात आला. रामटेकडी, वैदूवाडी, १५ नंबर, लक्ष्मी कॉलनी, जुना कॅनॉल, विठ्ठल नगर, डवरीनगर, विशालनगर, अजिंक्य कॉलनी, बनकर कॉलनी, उन्नतीनगर, अमरलता, अमरछाया सोसायटी परिसरात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. 

''कचरा, वाहतूक कोंडी, अपुरे पाणी या समस्यांना हडपसरवासियांना तोंड द्यावे लागते आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुशिक्षित, हक्काचे आणि परिवर्तनशील, पुरोगामी विचारांचे नेतृत्व. निवडून द्यावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी नागरिकांना केले.यावेळी नगरसेवक आनंद अलकुंटे, नगरसेवक अशोक कांबळे, बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर, पूजाताई कोद्रे, फारुख ईनामदार, शिवाजी पवार, दिलीप शंकर तुपे, नीलेश मगर, डॅा. शंतनू जगदाळे, विजय मोरे, संजीवनी जाधव, प्रशांत पवार, विशाल तुपे, लहू कांबळे, विशाल जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, रिपाई जोगेंद्र कवडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar's meeting will be held tomorrow to promote Chetan Tupe