शरद सोनवणेच जुन्नरचे पुन्हा आमदार होणार : नगराध्यक्ष शाम पांडे

दत्ता म्हसकर
गुरुवार, 14 जून 2018

जुन्नर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. मात्र जुन्नरचे शिवसेनेचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी मात्र आमदार शरद सोनवणेच पुन्हा तालुक्याचे आमदार होणार असल्याचे जाहीर सभेत सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर पांडे यांचे वक्तव्य शिवसेनेच्या इच्छुकांना विचारात पाडणारे ठरले आहे. त्यांनी केलेले भाकीत खरे ठरणार का याची चर्चा रंगू लागली आहे.

आमदार सोनवणे यांच्या प्रयत्नातून लोकसेवा बँकेतील तालुक्यातील पतसंस्थाच्या अडकलेल्या ठेवी अंशतः मिळल्याबद्दल तालुका फेडरेशनच्या सहकार्याने पतसंस्थेने आभार व्यक्त करण्यासाठी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

पांडे म्हणाले, तालुक्यात आमदार सोनवणे यांनी विकासाची अनेक कामे करताना जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. काम चांगले असल्याने यापुढे ते आमदार होतील. मात्र ते कोठून होतील व कसे होतील हे सांगता येत नसले तरी ते आमदार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. शिवसेनेकडून माऊली खंडागळे, आशा बुचके, या प्रमुख नावासह अनेक जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची नावे इच्छुकांत चर्चिली जात आहे. आमदार सोनवणे शिवसेनेत जाणार व त्यांना उमेदवारी मिळणार या चर्चेनंतर ते मनसेतून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर झाले आहे. असे असताना शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पांडे यांच्या विधानाने राजकीय खळबळ उडाली आहे. 

Web Title: Sharad Sonawane will be the MLA again - Sham Pandey

टॅग्स