पतसंस्थाची लोकसेवातील उर्वरीत रक्कम मिळवून देणार : शरद सोनावणे

दत्ता म्हसकर
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जुन्नर : पुणे येथील लोकसेवा बँकेतील जुन्नर तालुक्यातील पंतसंस्थांची गुंतवणुकीची उर्वरित सर्व रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी येथे सांगितले.

येथील श्री वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 29 व्या वार्षिक सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष सी. बी. गांधी अध्यक्षस्थानी होते. अमित बेनके, तात्यासाहेब गुंजाळ, बाबा परदेशी, देवराम लांडे, अलका फुलपगार, उपाध्यक्ष विनय सासवडे, ज्येष्ठ संचालक सतीश परदेशी यांचेसह संचालक, सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनवणे म्हणाले, तालुक्यातील 9 पंतसंस्थांची सुमारे 28 कोटींची ठेव लोकसेवामध्ये गुंतली आहे. ही ठेव तालुक्यातील सर्व सामान्यांची असल्याने ती मिळवी यासाठी मधल्या काळात केलेल्या प्रयत्नामुळे 45 टक्के रक्कम परत मिळण्यात यश आले आहे तर 40 टक्के रक्कम लवकरच परत केली जाणार आहे. उर्वरित 15 टक्के रक्कमही परत मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सभासदाच्या गुणवंत मुलांचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले संचालक तसेच सभासदांचा, गुणवंत कर्मचारी म्हणून नीलम पंडित व दैनदिन ठेव प्रतिनिधी जितेंद्र परदेशी व अजित सोनपाटकी यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. बाबा परदेशी, राजेंद्र पानसरे, ज्ञानेश्वर नावगैरे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. अहवाल वाचन संतोष टन्नू यांनी केले. प्रास्तविक सी. बी. गांधी यांनी व स्वागत विनय सासवडे यांनी केले. सतीश परदेशी यांनी आभार मानले.

Web Title: Sharad Sonawane will get the rest of the money of credit society