
Warishe Murder Case : वारसे हत्या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी; पुण्यात पत्रकार रस्त्यावर
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथल्या प्रस्तावित रिफयनरीला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरणचांगलंच तापताना दिसत आहे. पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पत्रकार संघटनांसह अनेक राजकीय नेत्यांनी वारीसे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळताना दिसत आहे. आता पत्रकार वारीसे यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर आता दिवंगत पत्रकार हत्याकांड प्रकरणी पुण्यात पत्रकारांकडून निदर्शने करण्यात आली.
गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन, निदर्शनं करण्यात येतील असा इशारा संघटनांनी दिला आहे. दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी पुणे शहरात आज पत्रकारांनी आंदोलन करण्यात आले.
यामध्ये ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बालगंधर्व चौकातील आंदोलनात निषेधच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही भूमिका घेण्यात आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आरोपींवर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.