
सेवासदनच्या अध्यक्षा शशिताई श्रीकांत किर्लोस्कर (वय ८७) यांचे शुक्रवारी निधीन झाले.
Shashitai Kirloskar : शशिताई किर्लोस्कर यांचे निधन
पुणे - सेवासदनच्या अध्यक्षा शशिताई श्रीकांत किर्लोस्कर (वय ८७) यांचे शुक्रवारी निधीन झाले. त्यांच्या मागे मुलगी रूपलेखा आणि मुलगा विक्रम असा परिवार आहे. प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत शंतुनराव किर्लोस्कर यांच्या त्या सूनबाई होत.
मुळच्या बेळगावच्या असलेल्या शशिताई यांचे शिक्षण कोल्हापूरातील राजाराम कॉलेजमध्ये झाले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्या सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रात सक्रिय होत्या. टेबल टेनिस या खेळात त्यांना विशेष प्राविण्य होते.
१९५७ मध्ये त्यांचे श्रीकांत किर्लोस्कर यांच्याशी लग्न झाल्यानंतर बराच काळ त्या सोलापूरात होत्या. तेथे सेवासदन, रेडक्रॉस आणि होमगार्ड या संस्थांसोबत सक्रीय काम केले. १९८० मध्ये पुण्यात परतल्यावर त्यांच्याकडे हॉटेल ब्लू डायमंडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी होती. प्रेमळ आणि आपुलकीच्या आदरतीथ्यामुळे शशिताईंनी कामगारांपासून येणाऱ्या पाहुण्यांपर्यंत सर्वांचीच मने जिंकली होती. म्हणूनच बारामतीतील हॉटेल ब्लू डायमंडच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. पुण्यातही सेवासदनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी सक्रीय पद्धतीने सामाजिक जबाबदारी पार पाडली.