शत्रुघ्न काटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २८ (रहाटणी पिंपळे सौदागर) मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शत्रुघ्न काटे, जयनाथ काटे, कुंदा भिसे, निर्मला कुटे यांच्या प्रचाराचा प्रारंभ गोविंद गार्डन चौकातून करण्यात आला. रहाटणी-पिंपळे सौदागरमधील मतदार हा सुजाण, सुशिक्षित असून, भारतीय जनता पक्षाच्या मागे तो खंबीरपणे उभार राहील, असा विश्‍वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी व्यक्त केला. 

या वेळी संजय कुटे, संजय भिसे, भरत काटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उमेदवारांनी रहाटणीपर्यंत पदयात्रा काढून परिचयपत्रके वाटून मतदारांशी संपर्क साधला. ज्येष्ठ नागरिकांबरोबर महाविद्यालयीन युवक व युवती या पदयात्रेत उमेदवारांच्या समवेत होते. सर्व उमेदवारांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले.

Web Title: Shatrughan kate start campaign