दक्षिण कोरियात घुमला 'जय भवानी जय शिवाजी'चा जयघोष

मराठी मंडळ कोरिया ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील मराठी चित्रपटाचे कोरियात आयोजन करून पहिला आणि नवीन कार्यक्रम सुरू करण्याची संधी मिळाली
Sher Shivray Movie in South Korea
Sher Shivray Movie in South KoreaSakal
Summary

मराठी मंडळ कोरिया ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील मराठी चित्रपटाचे कोरियात आयोजन करून पहिला आणि नवीन कार्यक्रम सुरू करण्याची संधी मिळाली

पारगाव - दक्षिण कोरियात सेओल शहरात 'जय भवानी जय शिवाजी' जयघोषात मराठी मंडळ कोरिया (एम एम के) यांच्या वतीने अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारीत 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या खास 'शो'चे काल रविवार (दि. २९) रोजी आयोजन करण्यात आले होते. चित्रपट पाहण्यासाठी कोरियास्थित मराठीजणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

सेओल शहरातील कोणकुक इनव्हरसिटी च्या थिएटर मध्ये शेर शिवराज चित्रपट प्रदर्षित करण्यात आला.

मागील दोन वर्षे कोविडमुळे सर्व कार्यक्रम बंद होते. यावर्षी मराठी मंडळ कोरिया ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील मराठी चित्रपटाचे कोरियात आयोजन करून पहिला आणि नवीन कार्यक्रम सुरू करण्याची संधी मिळाली. हा अनुभव अप्रतिम होता, जिथे थोर राजा छत्रपती शिवाजी यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मराठी समाज एकरूप होऊन एकवटला. शेवटी अतुल खोत यांनी शिव गर्जना देऊन कार्यक्रमाचे सांगता केली. हा कार्यक्रम यशस्वी आणि अविस्मरणीय करण्यासाठी संतोष पाटील (कोल्हापूर), दीक्षा शिंदे-पाटील (अवसरी खुर्द, पुणे), गौरव थोरात (संगमनेर), प्रदीप देसले (धुळे), विनायक पराळे (कोल्हापूर), अभिजित कदम (सातारा) व मराठी मंडळ कोरिया चे सर्व सदस्य यांनी उत्कृष्ट नियोजन केले त्यानंतर सर्वांनी तुकसेओम पार्कमध्ये डब्बा पार्टीचा आनंद लुटला. हा देखील मराठी मंडळ कोरियाचा एक महत्वाचा कार्यक्रम ठरला शेवटी आभार दिलीप पाटील (सांगली) यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com