शेरकरांनी माणसातील माणुसकी जपण्याचे काम केले : वसंत हंकारे

दत्ता म्हसकर
सोमवार, 28 मे 2018

जुन्नर - माणसातील माणुसकी जपण्याचे काम करणारे कै. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या आदर्श विचारांचा जागर करण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन युवा व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांनी शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथे केले.

श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर व स्व.हिराबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. 

यावेळी विठ्ठलबाबा मांडे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, बाजारसमितीचे सभापती संजय काळे, सुनील शेवाळे, भिमाजी गडगे, अनंतराव चौगुले, सुमित्राताई शेरकर, बाबाजी शेरकर,अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप सर्व संचालक, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले, सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

'आजकाल माणुसकी हरवत चालली असल्याची' खंत व्यक्त करीत हंकारे म्हणाले, निवृत्तीशेठ यांनी केवळ साखर कारखाना उभा केला नाही तर, यासाठी अनेक त्रास व वेदना सहन करत जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील हजारो कुटुंबे उभी केली. त्यांच्या सारख्या शुद्ध चारित्र्याच्या माणसाची व त्यांनी जपलेल्या विचार व कार्यकर्त्यातुन उभ्या केलेल्या माणसांना जपण्याची खरी गरज असल्याचे ते म्हणाले. आपल्या मुलांना घडवा, त्यांना जपा हीच तुमची संपत्ती आहे. मुलांनी देखील आईवडिलांना मान खाली घालावी लागेल असे वागू नये. माणुसकी हीच खरी संपत्ती असून, तिची जपवणूक करा असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.

यावेळी आशा बुचके, उल्हास नवले, तानाजी बेनके, दिलीप ढमढेरे, संजय काळे, सुनील शेवाळे यांची आदरांजलीपर भाषणे झाली. सत्यशील शेरकर, अभिजित शेरकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचलन लक्ष्मण शेरकर यांनी केले अशोक घोलप यांनी आभार मानले.

Web Title: Sherkar did the work of raising man's humanity: Vasant Hankare