शेवंतीने खाल्ला तीन वर्षातील सर्वांधीक भाव

दत्ता जाधव
Saturday, 24 October 2020

कोरोनामुळे शेतकऱ्यांनी शेवंती लागवडीकडे पाठ फिरवल्याने बाजारात अत्यंत कमी प्रमाणात शेवंती फुलांची आवक असल्याने मागील दोन वर्षातील शेवंतीच्या फुलांना आज विक्रमी तीन वर्षातील बाजार भाव मिळाले. शेवंतीची फुले दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती दोनशे ते अडीचशे रुपये किलोपर्यंत विकली गेली.

माळशिरस - कोरोनामुळे शेतकऱ्यांनी शेवंती लागवडीकडे पाठ फिरवल्याने बाजारात अत्यंत कमी प्रमाणात शेवंती फुलांची आवक असल्याने मागील दोन वर्षातील  शेवंतीच्या फुलांना आज विक्रमी तीन वर्षातील बाजार भाव मिळाले . शेवंतीची फुले दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती दोनशे ते अडीचशे रुपये किलोपर्यंत विकली गेली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील दोन वर्षी शेवंती फुलांच्या मोठ्या प्रमाणावर ती होत असलेल्या लागवडीमुळे व शेवंती वर्गीय इतर फुलांचे बाजारात होत असलेल्या आवकेचा परिणाम परिणाम होऊन शेवंती उत्पादकांना दोन्ही वर्षांमध्ये तोटा सहन करावा लागला होता. दोन्ही वर्षात  शेवंतीच्या फुलांचे बाजार भाव दसरा दिवाळीतही शंभर रुपये किलोच्या पुढे गेले नव्हते .दोन वर्षांपूर्वी तर बाजारात शेवंतीची फुले ठेवण्यासही  जागा नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणावर ती विक्रमी फुलांची आवक बाजारात होती. यंदा मात्र कोरोना मुळे फुलांच्या विक्री वरती परिणाम होईल या भीतीने शेवंती उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ती शेवंती लागवडीकडे पाठ फिरवली.

डीएसके प्रकरण : उलाढालीची कुंडली सादर करा; तपास यंत्रणेला कोर्टाने दिली शेवटची संधी

यामुळे कमी प्रमाणात झालेल्या फुलांच्या लागवडीमुळे नवरात्र उत्सव ,दसरा या काळात सध्या शेवंती फुलांची नेहमीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात आवक झाल्याने दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शेवंतीच्या फुलांना शंभर रुपयापासून दर्जानुसार अडीचशे रुपये किलोपर्यंत बाजार भाव मिळाला.

मागील तीन वर्षातील शेवंतीच्या फुलांचा हा विक्रम ठरला. यामुळेच ज्या शेतकऱ्यांनी शेवंतीचे उत्पादन घेतले होते त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ती समाधान दिसत होते. पावसामुळे मालाच्या उत्पादनावर ती जरी परिणाम झालेला असला तरी देखील चांगले बाजार भाव असल्याने शेवंती उत्पादकांना यंदा सुगीचे दिवस जाणवले. झेंडूच्या फुलांना मात्र गणपती उत्सवाच्या तुलनेत अपेक्षित बाजार भाव मिळाला नाही. दसरा सणाच्यासाठी झेंडू हे महत्त्वाचे फुल असूनही त्या तुलनेत  गणपती प्रमाणे बाजार भाव मिळाले नाही.

शून्य अपघाताचे 'बारामती मॉडेल' विकसित होणार; अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी घेतला पुढाकार

गणपतीत झेंडू ठोक विक्री तीनशे रुपये किलोपर्यंत गेली होती ती दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मात्र झेंडू 80 रुपये पासून दीडशे रुपये किलो पर्यंत विकला गेला मात्र मागील दोन वर्षाचा विचार करता यंदा झेंडू उत्पादकांनाही दसऱ्यात, नवरात्र उत्सवात समाधानकारक भाव मिळाले. बाजारातील फुलांच्या कमी आवकेचा परिणाम सर्व फुलांच्या बाजारभाव वरती जाणवला. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संकट काळातही धाडस करून फुलांच्या लागवडी केल्या त्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा नवरात्र उत्सव फलदायी ठरला. याबाबत फुलउत्पादक कल्याण गायकवाड व शांताराम यादव यांनी सांगितले की कोरोना च्या सुरुवातीच्या काळात फुलांची लागवड करावी की न करावी अशी द्विधा मनस्थिती असताना धाडस करून शेवंती फुलांचे लागवडी केल्या मात्र हे धाडस संकट  काळातही तारणहार ठरलं .

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shevanti Flower Rate high in pune district