हांडेवाडी रस्त्यावरील भाजी विक्रेते पथारीवाल्यांचे स्थलांतर होणार

समीर तांबोळी
शुक्रवार, 6 जुलै 2018

उंड्री (पुणे) : हांडेवाडी रस्त्यावरील जैन टाऊनशिप समोरील भाजी मंडईचा प्रश्न बर्‍याच दिवसापासून प्रलंबित आहे. रस्त्यावरील भाजी मंडई मुळे येथे सतत वहातूक कोंडी होत असते. परंतू हातावर पोट असणार्‍या पथारी, हातगाडी वाल्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक होते. आता त्यांचे महापालिकेने शेजारीच बांधलेल्या मंडईमध्ये स्थलांतर होणार आहे. गुरुवारी (ता. ५) अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त माधव जगताप यांच्या उपस्थितीत गाळा/जागा वाटपासाठी ड्रॉ काढण्यात आले. त्यामध्ये फळ विभाग, भाजी, मासळी यासाठी स्वतंत्र ड्रॉ काढण्यात आले. लवकरच पथारीवाल्यांचे भाजी मंडईत स्थलांतर होणार असल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.  

हांडेवाडी रस्त्यावर पथारी, हाथगाडी वाल्यांची एकूण संख्या २०५ आहे. सध्या निर्मानाधीन मंडईत फक्त ६९ पक्के गाळे तयार आहेत. ज्या पथारीवाल्यांना ड्रॉमध्ये पक्के गाळे मिळाले नाही त्यांच्या साठी मंडईच्या आत असणार्‍या मोक्ळ्या जागेत तात्पुरती जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी येत्या १५ दिवसात मूरूम टाकूण सर्व पथारी वाल्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहीती झोनल आ्धीकारी डी.एस.ढोकळे यांनी दिली. ज्या व्यक्तीच्या नावे ड्रॉ निघाला आहे, त्याने किंवा त्याच्या कुटूंबीयानेच तेथे व्यवसाय करावयाचा आहे. जर यामध्ये अनियमितता आढलली तर तात्काळ परवाना रद्द करून प्रतिक्षा यादीतील व्यक्तीला तो बहाल केला जाईल असे ढोकळे यांनी सांगितले.

ड्रॉ पद्धतीला  संघटनांचा विरोध
भाजी मार्केट चे काम सध्या अर्धवट अवस्थेत आहे.संपुर्ण सुविधायुक्त भाजी मार्केट झाल्याशिवाय गाळेवाटप करण्यात येऊ नये अशी मागणी हडपसर पथारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष नासिर शेख यांनी केली आहे.

१५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई होणार - माधव जगताप
भाजी मंडईचे उर्वरीत कामाकरिता ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम टप्प्याटप्प्याने पुर्ण होणार आहे. हांडेवाडी रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी करण्याकरीता पथारी वाल्यांचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. हांडेवाडी रस्ता नो हॉकर्स झोन घोषीत करण्यात आला आहे. १५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: shifting of vegetable sellers from handewadi