शिक्रापूरात यात्रा कमेटी अध्यक्षावर गोळीबार

भरत पचंगे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

शिक्रापूर (ता. शिरूर, पुणे): येथील श्री हनुमान यात्रा कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र भालचंद्र करंजे (वय 46, रा. पाबळ चौक, शिक्रापूर) यांचेवर आज (गुरुवार) पहाटे अडीचच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. अंगावर किंमती दागीने घालून शिक्रापूरात फिरणारे करंजे यांचेवर झालेला हल्ला प्राथमिक तपासानुसार अंगावरील सोन्यावरुन झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून, या झटापटीत करंजे यांचे तीन तोळ्याचा गोफ हल्लेखोरांनी पळविला.
 
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील श्री हनुमान यात्रा मंगळवार व बुधवारी (दि.3 व 4) होती. यात्रेसाठीचा तमाशा बुधवारी रात्री सुरू असताना यात्रा कमेटी अध्यक्ष राजेंद्र करंजे हे गुरुवारी (दि. 5) पहाटे अडीचच्या सुमारास आपल्या दुचाकीवर घरी निघून आले. या दरम्यान त्यांचा पाठलाग करीत तीन जण त्यांच्या मागूनच दुचाकीवर त्यांचेघरापर्यंत पोहचले अन गाडी स्टॅंडला उभी करताच तीन जण त्यांचेजवळ येवून त्यांनी गळ्यातील चैन काढ से हिंदीत म्हणू लागले. यावर करंजे यांनी विरोध करताच तीन चोरट्यांपैकी एकाने त्यांचे दिशेने गोळी झाडली असता ती त्यांच्या उजव्या मांडीतून आरपार गेली. एवढे होताच हातातील सोन्याचे कड्याची मागणी चोरटी करु लागले. यावेळी मात्र करंजे यांनी विरोध करुन आरडाओरड करताच पुन्हा चोरट्यांनी दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी हुकली तर दूसरी हाताच्या पंज्यात अडकली. या गोंधळात आजूबाजूचे शेजारी घराबाहेर पडताच हल्लेखोर पाबळच्या दिशेने पळून गेले.

या संपूर्ण घटनेत करंजे यांचे तीन तोळे सोने चोरील गेले. घटनेनंतर करंजे यांना तात्काळ पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या जिवीताला कुठलाही धोका नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे वतीने सांगण्यात आले. दरम्यान घटनेनंतर तात्काळ अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांचेसह पोलिस निरिक्षक रमेश गलांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, झालेला हल्ला केवळ चोरीच्या उद्देशानेच होता की, आणखी काही कारणे आहेत याचा तपास पोलिस करीत आहेत.

गावठी कट्टा पोलिसांना आव्हानच...
दोन वर्षांपूर्वी या भागातील सणवाडीतील पिंटू दरेकर या युवकावर औद्योगिक ठेकेदारीवरुन झालेला हल्ला, दोन महिन्यांपूर्वी क्रांतीवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सागर दरेकर यांच्या नोकरावर झालेला हल्ला आणि काल झालेला राजेंद्र करंजे यांचेवर झालेला हल्ला हा गावठी कट्ट्यानेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पर्यायाने शिक्रापूर-सणसवाडी परिसरासह जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध होत असलेला गावठी कट्टा पोलिसांसाठी आव्हानच म्हणावा लागेल.

Web Title: shikrapur firing on the president of yatra committee