शिराळा : दलित महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन 

शिवाजीराव चौगुले
सोमवार, 3 डिसेंबर 2018

शिराळा - आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसन व इतर मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने शिराळा येथील तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्यावतीने तहसीलदार शीतल कुमार यादव यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे " २००५-०६ च्या अर्थसंकल्पात प्रथमच पारधी समाजासाठी तीस कोटी ३२ लाखाची तरतूद केली होती. मात्र प्रस्ताव न आल्याने सदरचा निधी परत गेला. त्यामुळे पारधी समाजासाठी शासन स्तरावर चांगले निर्णय होत असताना प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या समाजापर्यंत योजना पोहोचत नसल्याने हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

यावेळी आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करावे, या समाजाला दोन एकर बागायत किंवा चार एकर जमीन देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राहण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन गुंठे जागा व शासकीय योजनेतून घरकुल द्यावे. त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. कसण्यासाठी व राहण्यासाठी शासनाच्या जमिनी देण्यात यावेत याचे संबंधिताला आदेश द्यावे. आदिवासी विकास मंत्रालयाकडून अनेक योजना असताना अधिकारी पारधी समाजापर्यंत पोहोचली नसल्याने त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागले, तरी या योजनांची शासन स्तरावरून अंमलबजावणी व्हावी.  या समाजाला तात्काळ जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी दाखले व पिवळ्या शिधापत्रिका मिळाव्यात. त्याचा लाभ देण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या करण्यात आले आहेत.

यावेळी आनंदराव थोरात, सुधाकर वायदंडे, जितेंद्र काळे, टारझन पवार, गोरख लोंढे, दिनकर नांगरे, सदाभाऊ चांदणे, नागनाथ घाडगे, टारझन पवार, जहांगीर पवार, घायल काळे, राकेश काळे, चार्जिंग पवार, जागृती पवार, सचिन पवार, नाग्या पवार, दीपकपवार, वसंत कांबळे, राम जाधव उपस्थित होते.

या आंदोलनात भारिप बहुजन महासंघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष वसंत कांबळे, बेरड रामोशी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष राम जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिला.

Web Title: Shirala: Dalit Mahasangh organized a protest movement near Tehsil office